uddhav thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज; तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. एचएन रिलायन्स रुग्णालयात त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिलायन्स हॉस्पिटलचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली. चाचणीच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.

उद्धव ठाकरे यांना मणका-मानदुखीचा त्रास

मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास होत होता. एका कार्यक्रमात ते मानेला पट्टा बांधून आल्याचे दिसले होते. हा त्रास वाढल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणे टाळले होते. तसेच दिवाळीनिमित्त भेटीसाठी आलेल्या मान्यवरांनादेखील ते भेटले नव्हते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी सर्व्हायकल स्पाईन संबंधित यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गिरगावातील एच. एन. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्य मंत्रिमंडळाच्या बैठका, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आढावा बैठका यांना उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन उपस्थिती लावली होती. रुग्णालयात असतानाही मुख्यमंत्री ठाकरेंनी कामाचा धडाका कायम ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय कसोटी संघात Ruturaj Gaikwadला मोठी जबाबदारी; गटांगळ्या खाणारा संघ मजबूत होणार, जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

'मिर्झा एक्सप्रेस' काळाच्या पडद्याआड; हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचं निधन; अमरावतीत होणार अंत्यसंस्कार...

Latest Marathi News Live Update : अंबरनाथ जाहीर सभेत शिंदे भाजपवर हल्लाबोल, प्रवक्त्या ज्योती वाघमारेंची टीका

Kolhapur Marriage Pressure : लग्नासाठी मुली मिळेनात म्हणून आलं नैराश्य, मनातून खचला अन् तरुणाने थेट नदीत घेतली उडी...

अयोध्या ठरली युपीचे 'ग्रोथ इंजिन': योगी सरकारच्या धोरणांमुळे पर्यटन आणि व्यवसायात जबरदस्त वाढ

SCROLL FOR NEXT