Atul-Bhatkhalkar sakal media
महाराष्ट्र बातम्या

बैल गेला अन झोपा केला; भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

अवैध बांधकामांवर कारवाईचे उशिरा आदेश

कृष्ण जोशी

मुंबई : अवैध बांधकामांनी (illegal constructions) सारी मुंबई गिळंकृत केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी (cm uddhav Thackeray) त्यावर कठोर कारवाईचे दिलेले आदेश हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका भाजपचे मुंबई प्रभारी व आमदार अतुल भातखळकर (Atul bhatkhalkar) यांनी केली आहे.

कोणाच्याही दबावात न येता अनधिकृत बांधकामांवर युद्धपातळीवर कारवाई करावी, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेला दिला आहे. त्यावर भातखळकर यांनी वरीलप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुंबई महापालिकेत 30 वर्षे त्यांच्याच शिवसेनेची सत्ता असूनही असा आदेश देण्याची वेळ येते, याबद्दल आत्मचिंतन करावे, असाही सल्ला त्यांनी ठाकरे यांना दिला आहे.

अवैध बांधकामे, अवैध झोपड्या, राडारोडा टाकून बुझवलेली तिवरांची जंगले अशा प्रकारे साऱ्या मुंबईचे विद्रूपीकरण झाल्यावर आता त्यासाठी जागाच उरली नाही. मुंबईत सरकारी भूखंडांवर, डोंगरांवर, खाजण जमिनीत, पदपाथवर, जलवाहिन्यांवर अशी इंचन इंच जागा झोपडीमाफियांनी बळकावली. पाच मजली टोलेजंग झोपड्या उभारल्या. आता या अवैध बांधकामांविरोधातील कारवाईची सुरुवात मुख्यमंत्री आपले निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या अंगणातील बेहरामपाड्यापासून करणार का, असा प्रश्नही भातखळकर यांनी केला आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई-ठाण्यावर गेली पंचवीस तीस वर्षे निरंकुश सत्ता चालविणाऱ्या शिवसेनेचे हे पाप आहे. त्यांच्याच नगरसेवकांनी-शाखाप्रमुखांनी व कार्यकर्त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने चिरीमिरी उकळून या अवैध बांधकामांना संरक्षण दिले. या संगनमताची खुली चौकशी करण्याचे धाडस मुख्यमंत्री दाखवतील का, असा प्रश्नही भातखळकर यांनी विचारला आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आपण कठोर प्रशासक आहोत हे दाखविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची ही स्टंटबाजी सुरु असल्याचा टोमणाही भातखळकर यांनी मारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: सातवे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील विजयी

Solapur ZP election Results : माजी आमदार राम सातपुतेंची पत्नी विजयी, उत्तम जानकरांच्या मुलाचा पराभव; विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढला

Pune ZP, Panchayat Samiti Result : पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने बहुमताचा आकडा ओलांडला, पुण्यात कुठे कसा निकाल?

Kankavli Zilla Parishad Election Results : कणकवलीत शिंदेंच्या शिवसेनेचे वर्चस्व! रफिक नाईक ठरले 'टफ फायटर', पण विजय गुरुप्रसाद शिंदेंचाच; रामचंद्र राऊत तिसऱ्या क्रमांकावर

Kolhapur ZP : रिल्स स्टार काँग्रेस उमेदवार सोनाली सावंत विजयी, शिरोळमध्ये राजू शेट्टींनी खाते उघडले, गणपतराव पाटील, यड्रावकर गटासोबत जोरदार चुरस

SCROLL FOR NEXT