chagan bhujbal 
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्री त्रस्त आहेत, असं अजिबात वाटत नाही - छगन भुजबळ

'काँग्रेस-राष्ट्रवादीचा काहीही त्रास मुख्यमंत्र्यांना नाही'

रश्मी पुराणिक

मुंबई: "वैचारिक मतभिन्नता असते. राजकारणात सगळे मैत्री जपतात. विरोधी पक्ष दुष्मन नसतात मित्र असतात. कदाचित दानवे यांना शिवसेनेत यायचं असं असेल तर..." असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) नेते आणि मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर म्हटलं आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी 'आजी, माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी' असं विधान केलं. त्या विधानावरुन राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

"फडणवीसांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचा काहीही त्रास मुख्यमंत्र्यांना नाही. मागच्या पाच वर्षात शिवसेनेला भाजपने कशी वागणूक दिली हे सर्वांना माहीत आहे" असे भुजबळ म्हणाले. "केंद्रात मंत्री असताना इतर पक्षांना दिलेली मंत्रिपद आणि शिवसेनेची केलेली अवहेलना. सरकार स्थापन करताना घोळ, जवळ घेतल्यावर काय दिलं. हे सगळ्यांना माहीत आहे" असे भुजबळ म्हणाले. "मुख्यमंत्री त्रस्त आहेत, असं मला अजिबात वाटत नाही" असा दावा भुजबळ यांनी केला. "महाविकास आघाडीपासून धोका असेल. पण आघडीला धोका नाही" असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT