uddhav thackeray  uddhav thackeray
महाराष्ट्र बातम्या

या बंडामागे मी नाहीच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्टचं सांगितलं

रोहित कणसे

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. या राजकीय बंडाच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत बोलताना ठाकरे म्हणाले की, मी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही, असे असे उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं. यावेळी या एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी त्यांचा संबंध नसल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, संभ्रम पसरवला जातोय की या बंडाच्या मागे मी आहे, अजीबात नाही एवढा शिवसेनेच्या पाठीत वार करणारी औलाद नाही. मी शिवसेना प्रमुखांचा वारसा पुढे घेऊन जाणार आहे. मीच माझ्या पक्षाच्या पाठीत वार करू? काशासाठी.. जसा निर्णय महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला तसा परत उघड निर्णय घेतला असता. हे एक निमीत्त आहे, यामागचं कारण वेगळं आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आज आम्हाला साथ देत आहेत, शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. पण आमच्याच लोकांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. जे लोक जिंकू शकत नव्हते त्यांना आम्ही तिकिटे दिली आणि त्यांना विजयी केले. त्या लोकांनी आज आमच्या पाठीत वार केले.

ठाकरे यांनी सांगितले की, मला काही जणांच्या वर्तणुकीविषयी शंका आल्यानंतर मी एकनाथ शिंदेनां फोन केला आणि त्याबद्दल विचारलं. तेव्हा ते पहिला म्हणाले की राष्ट्रवादीवाले आपल्याला त्रास दिला. नंतर म्हणाले की आपण भाजपसोबत जाऊया असा आमदारांचा दबाव आहे. भाजपकडून आपल्याला तसा प्रस्ताव येऊदे असं मी सांगितलं. मातोश्रीची बदनामी, कुटुंबियांची बदनामी करणाऱ्यांच्या सोबत आपण का जायचं? विश्वासघात करणाऱ्या भाजपसोबत आपण का जायचं असं त्यांना विचारलं. त्यावेळी मी त्यांना आमदारांना घेऊन यायला सांगितलं. आमदार माझ्यासमोर आले असते आणि हे सांगितलं असतं तर ही वेळ आलीच नव्हती."

मी काम करू शकत नसेल आणि पक्ष चालवण्यास असमर्थ आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर मला सांगा. मी पक्षापासून वेगळे होण्यास तयार आहे, तुम्ही मला सांगू शकता. बाळासाहेबांनी म्हणल्यामुळे तुम्ही आतापर्यंत माझा आदर केला. मी लायक नाही असे तुम्ही म्हणाल तर मी या क्षणी पक्ष सोडण्यास तयार आहे, असे देखील त्यांनी पक्षातील नेत्यांना यावेळी सांगितलं.

जेव्हा हिंदुत्वाच्या नावाखाली भाजप आणि शिवसेना अस्पृश्य मानली जात होती आणि कोणीही भाजपसोबत जायला तयार नव्हते, तेव्हा हिंदुत्वाच्या मतांचे विभाजन होऊ नये, असे बाळासाहेब म्हणाले. आम्ही भाजपसोबत राहिलो आणि त्याचे परिणाम आता भोगत आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT