शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरे यांच्याकडून`मिशन वायू’बद्दल कृतज्ञता

नामदेव कुंभार

पुणे - कोरोनाच्या संकटाचा (Coronavirus) सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray, Chief Minister of Maharashtra) यांच्याकडे ‘मिशन वायू’तंर्गत सुमारे दहा कोटी रुपयांचे २५० बायपॅक व्हेंटिलेटर पुणे (Pune) प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्सतर्फे (पीपीसीआर) शनिवारी सुपूर्त करण्यात आले. पीपीसीआर (PPCR) आणि उद्योजकांच्या या सामाजिक जाणिवेबद्दल मुख्यमंत्री ठाकरे (Uddhav Thackeray, Chief Minister of Maharashtra) यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. (CM Uddhav Thackeray mission vayu Maratha Chembers For Commerce and Agriculture)

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲंड ॲग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) ‘पीपीसीआर’तर्फे आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे (Uddhav Thackeray, Chief Minister of Maharashtra) यांच्याकडे हे व्हेंटिलेटर सोपविण्यात आले. ज्या ठिकाणी साधनांची कमतरता आहे, तेथे त्यांचे तातडीने वितरण करण्यात येईल, असेही ठाकरे यांनी सांगितले. ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष सुधीर मेहता, महासंचालक प्रशांत गिरबने यांनी ‘पीपीसीआर’च्या मिशन वायूतंर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील पुणे (pune) आणि पिंपरी चिंचवड महापालिका आणि ३६ जिल्ह्यांत ४ हजार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, २५० बाय पॅक व्हेंटिलेटरचा पुरवठा केला आहे. तसेच १२ ऑक्सिजन प्लॅंटचीही उभारणी केली असल्याची माहिती दिली. त्याशिवाय दुसऱ्या टप्प्यात २५० व्हेंटिलेटर राज्य सरकारकडे सुपूर्त केले. मिशन वायूसाठी २५० मोठे उद्योग, सुमारे १ हजार उद्योजकांपेक्षा जास्त लोकांनी आर्थिक हातभार लावल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी चेंबरचे आजी-माजी अध्यक्ष व पदाधिकारी, उद्योजक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच राज्य सरकारचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंग उपस्थित होते. माजी अध्यक्ष प्रताप पवार, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर, विभागीय आयुक्त सौरभ राव यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘मिशन वायू’ हा स्तुत्य उपक्रम असून, हे मॉडेल राज्यभर राबवले जाऊ शकते. संकटाच्या काळात उद्योगांनी दिलेला मदतीचा हात मोलाचा ठरला. त्यांच्याशी समन्वयही चांगल्या पद्धतीने झाला, असेही राव यांनी नमूद केले. कोरोनाच्या काळात पीपीसीआरच्या सहकार्यामुळे शहरातील व्हेंटिलेटरची क्षमता ३५ टक्क्यांनी वाढली तर, कोविड बेडची संख्येत लक्षणीय वाढ झाली. तसेच बेड मॅनेजमेंटसाठी सॉफ्टवेअरही तयार करण्यात मदत केल्याचे अध्यक्ष मेहता यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : सैलानी येथे दर्शनाला जात असलेल्या वाहनाचा अपघात

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT