Uddhav Thackeray on ED Action e sakal
महाराष्ट्र बातम्या

लढत राहायचं! तपास यंत्रणांच्या कारवाईवरून मुख्यमंत्र्यांचा निर्धार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नव्हती. आता मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली असून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईविरोधात लढत राहायचं, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे. (Uddhav Thackeray on ED Action)

मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची मालमत्ता ईडीने (ED Action CM Uddhav Thackeray Relative) जप्त केली. त्यानंतर महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच यापूर्वीही राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांवर कारवाई करण्यात आली. केंद्रीय तपास यंत्रणांच्या वाढत्या कारवायांबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारले असता त्यांनी घाबरू नका, आपण लढत राहायचं, असा निर्धार व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकारची जशास तसं उत्तर देण्याची तयारी असल्याचं समजते. त्यामुळे आता महाविकास आघाडी विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणा हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि ईडीच्या काही अधिकाऱ्यांविरोधात पुरावे दिले होते. त्यांच्यावरील कारवाईचं काय झालं? असा प्रश्न काही आमदारांनी बैठकीत उपस्थित केला. त्याबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी संबंधित आमदारांसोबत चर्चा केल्याचे समजते. आता राज्य सरकार ईडी कारवायांना कसं उत्तर देते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर दोन दिवसांपूर्वी ईडीने कारवाई केली. त्यांच्या निलांबरी प्रोजेक्टमधील ११ सदनिका जप्त करण्यात आल्या. तसेच त्यांचे हवाला ऑपरेटरसोबत संबंध असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देशभरात धार्मिक वाद निर्माण होण्याची शक्यता टळली? CJI सूर्यकांत यांनी न्यायमूर्ती अमानुल्लाह यांच्याकडून दोन प्रकरणे का घेतली परत?

Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँकेसाठी जयकुमार गोरेंना क्रॉस व्होटिंगची भिती?, दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

IND vs NZ, 1st Test: हा काय मुर्खपणा.... शतकवीर निकोल्सलची विकेट मिळाली होती, रिषभ पंत- पडिक्कलमध्ये गोंधळ अन् सुटला सोपा झेल

Marathi News Live Updates : ओंकार हत्तीवरून ग्रामस्थ आणि वनकर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी

Ratnagiri ACB Trap : परदेशी जहाजाच्या क्लिअरन्ससाठी मागितली 80 हजारांची लाच! बंदर अधिकाऱ्यावर एसीबीचा मोठा सापळा; रत्नागिरीसह मुंबईतील भुजबळच्या घरांची झडती

SCROLL FOR NEXT