uddhav-thackeray-sad 
महाराष्ट्र बातम्या

सरकारला ना सर्वोच्च न्यायालयाची तमा ना विद्यार्थ्यांची काळजी!

सरकारला ना सर्वोच्च न्यायालयाची तमा ना विद्यार्थ्यांची काळजी! भाजपच्या केशव उपाध्येंची सरकारवर जोरदार टीका CM Uddhav Thackeray slammed by BJP Keshav Upadhye over HSC Result 2021 vjb 91

विराज भागवत

भाजपच्या केशव उपाध्येंची सरकारवर जोरदार टीका

HSC Result 2021 मुंबई: महाराष्ट्र बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केला. त्यानंतर साऱ्यांचे लक्ष हे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाकडे लागले होते. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी ३१ जुलैपर्यंतचा वेळ दिला होता. त्यानुसार १०वीचा निकाल जाहीर झाला, पण १२वीचा निकाल अद्यापही जाहीर झालेला नाही. राज्य सरकारची अशी भूमिका म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ आहे, असा घणाघात भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला. (CM Uddhav Thackeray slammed by BJP Keshav Upadhye over HSC Result 2021 vjb 91)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला ना सर्वोच्च न्यायालयाचे तमा ना १२ वीच्या विद्यार्थ्यांची काळजी सर्वोच्च न्यायालयाने 12वी परीक्षेचा निकाल ३१ जुलै ला जाहिर करा असे स्पष्टकेल होते मात्र ते जाहीर न करून सरकारने केला न्यायालयाचा अवमान तर केलाच पण लाखो विद्यार्थ्यांचा भवितव्याशीखेळ चालविला आहे, अशी टीका त्यांनी ट्वीटमधून केली.

बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी दिलेली ३१ जुलैची मुदत पाळण्यासाठी आघाडी सरकारने लक्ष केंद्रीत करायला हवे होते.मात्र निकालासाठीची मुदत न पाळून महाविकास आघाडी सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत आपण किती उदासीन आहोत हेच दाखवून दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात अजून स्पष्टीकरणही दिलेले नाही, हे आणखी धक्कादायक आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) गेल्या आठवड्यात 10 वीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला. त्यानंतर बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. 12वीचा निकाल 30 जुलैला जाहीर होता, पण आता हा निकाल ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे असे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

IND vs PAK: अक्षरच्या गोलंदाजीवर मोठा शॉट मारायला गेला पण…; शानदार झेल घेत तिलकने झमानला दाखवला ‘शॉर्टकट टू पॅव्हेलियन’, पाहा व्हिडिओ

Minister Nitin Gadkari: पाणी व्यवस्थापनाने शेतकरी ऊर्जादाता: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; नाम फाउंडेशन दशकपूर्तीनिमित्त कार्यक्रम

SCROLL FOR NEXT