- कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आपल्याला गाव कोरोनामुक्त ही मोहिम राबवावी लागेल.
- मला पुन्हा पुन्हा लॉकडाउन लावण्याची इच्छा नाही. पण काही परिस्थितीत ते नाईलाजानं करावं लागेल.
- आजपर्यंत आपण जसं सहकार्य केलं तसंच सहकार्य इथून पुढेही मला अपेक्षित आहे.
- रस्त्यावर उतरणं म्हणजे तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरु नका.
- जे लोक लॉकडाउनविरोधात बोलणाऱ्यांनी कोविड योद्धे म्हणून रस्त्यावर उतरावं. कोरोनाची साथ हा सरकारी उपक्रम नाही. त्यामुळे असा विचार मनातून काढून टाका.
- निर्बंध आपण पुढील १५ दिवस वाढवत आहेत. काही जिल्ह्यांत हे निर्बंध वाढतील तर काही जिल्ह्यांत शिथील होतील.
- शेतीविषयक कामांची दुकानांना शिथिलता देण्यात येणार आहे. पण अशा दुकानांमध्ये जास्त गर्दी होता कामा नये. कोरोनाची बंधन पाळा.
- कोरोनामुक्त गाव ही मोहिम आता आपल्याला राबवायची आहे. याचा पुढाकार महाराष्ट्रानं घ्यायचा आहे. जे देशासाठी पथदर्शी ठरेल.
- हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांनी आपलं गाव कोरोना मुक्त केलं, असं सर्वांनी एकत्रित काम केलं पाहिजं.
- जनतेनं सहकार्य केलं नाही तर सरकार काहीही करु शकत नाही. आपण सहकार्य केलं नसतं तर आपणं दुसऱ्या लाटेवर मात करु शकलो नसतो. हे संकट अद्याप संपलेलं नाही.
- मधल्या काळात आपण लॉकडाउनमधून शिथिलता आणण्याचा प्रयत्न केला, त्याचे परिणामही आपण पाहिजे.
- या आठवड्यात उद्योगपतींची भेट घेणार आहे. कारण अर्थचक्र चालू राहिलं पाहिजे.
- शिक्षणाबाबत क्रांतीकारण निर्णय घेण्याची आपल्याला गरज आहे. याबाबत आपण योजना तयार करत आहोत.
- देशासाठी शैक्षणिक धोरण एक असायला हवं. दहावीबाबत आम्ही निर्णय घेतला पण बारावीचा निर्णय घ्यायचा आहे. यामध्ये देशभरात एकच धोरणं असायला हवं. त्यामुळं विद्यार्थांचं नुकसान होणार नाही.
- १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्येसाठी लागणाऱ्या दोन्ही डोस मिळून १२ कोटी लशींचे डोस एक रकमी घेण्याची आपली तयारी आहे. यासाठी आपण २४ तास लसीकरण करु शकतो. पण याला मर्यादा आहे, त्यात लसींचं उत्पादनं महत्वाचं आहे. जसा लसींचा पुरवठा वाढेल तसा आपण लशीकरणाचा वेगही वाढवणार आहोत.
- ४५ वयोगटावरील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्रानं घेतलीय. तर १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांची आहे.
- तरी सुद्धा लहान मुलांना या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका बसू नये यासाठी आपण सध्या जशी काळजी घेत आहोत, तशीच काळजी घेणं गरजेचं आहे.
- तिसरी लाट लहान मुलांमध्ये आली तर घाबरुन जायचं काम नाही. कारण त्यांच्यामध्ये आपल्यापेक्षा प्रतिकारशक्ती जास्त असते.
- पावसाळ्यातील साथीचे आजार आणि त्यात कोरोनाची लक्षणं त्यामुळं कोविडचा रुग्ण ओळखता येत नाहीत.
- राज्यानं तयार केलेल्या टास्कफोर्समध्ये आपण तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली आहे.
- तिसरी लाट आली तर आपण बेड वाढवू पण ऑक्सिजनची कमतरता भासली तर आपल्याला कठीण जाऊ शकतं. त्यातचं आता म्युकरमायकोसिसचा आजारही आला आहे. राज्यात याचे ३००० रुग्ण आहेत.
- राज्याची ऑक्सिजन निर्मिती क्षमता १२०० मेट्रिक टनची होती तर गरज १७०० मेट्रिक टनची होती.
- कडक लॉकडाउन नाही पण निर्बंध कायम राहणार
- रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९२ टक्क्यांवर
- फेरीवाल्यांसाठी ५२ लाखांचा निधी दिला.
- घरेलू कामगारांच्या खात्यात सरकारनं ३४ लाख रुपये जमा केले.
- कोरोना काळात साडेआठशे रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा
- किनारपट्टीच्या भागात कायमस्वरुपी उपाय योजना करणं गरजेचं
- तौक्ते चक्रीवादळात सराकरनं चांगलं काम केलं.
- महिन्याभरापासून आपण नेमकं कुठ आहेत? आणि पुढे काय करायचं आहे? याची माहिती मी देणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.