coaches of Pawan Express derailed near Lahvit in Nashik pleople injured  esakal
महाराष्ट्र बातम्या

नाशिकजवळ रेल्वेचे डबे रुळावरुन घसरले; एक ठार, 5 प्रवासी जखमी

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळ असणार्‍या लहवित जवळ रेल्वेचे डबे लाईन तुटून पडली. या अपघातात अनेक लोक जखमी झालेले असून, एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पवन एक्सप्रेस नाशिकच्या 12 किमी आधी रुळावरून खाली उतरल्याने मोठा अपघात झाला. (LTT- Jaynagar Express derails between Lahavit Devlali near Nashik)

अपघात निवारण दलाची धाव

मुंबई मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सव्वातीनच्या सुमारास एलटीटी-जयनगर (११०६१) एक्स्प्रेसचे अकरा डबे लहवित आणि देवळालीदरम्यान डाउन मार्गावर रुळावरून घसरले. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून रेल्वे पोलिस, वैैद्यकीय पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. रेल्वेचे डबे रुळावरून घसरल्याने त्या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहे.

रेल्वे रुळाला तडे गेल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंंदाज आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय, याबाबत रेल्वेकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मध्य रेल्वेने ट्विटरवर अपघाताची माहिती दिली आहे. यात मदतीसाठी बचाव पथक घटनास्थळी रवाना दाखल झाले असून जखमींना उपचारासांठी रुग्णालयात नेण्यात येत आहे.

नाशिकमध्ये रेल्वे रुळावरुन घसरल्याने ५ प्रवासी जखमी झाले आहेत. रुळांजवळ सापडलेला एक मृतदेह प्रवाशाचा नसून रेल्वे रुळावरून घसरण्याआधीपासून तो तेथे असल्याचे मानले जात आहे अशी माहिती मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे. दरम्यान घटनास्थळी आढळलेला मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : सैलानी येथे दर्शनाला जात असलेल्या वाहनाचा अपघात

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT