narayan Rane mumbai esakal
महाराष्ट्र बातम्या

आघाडी सरकार जून महिन्यात कोसळण्याचे नारायण राणेंचे भाकीत

राज्यातील आघाडी सरकार तीन फांद्याचे झाड आहे, जून महिन्यात हे आघाडी सरकार कोसळेल

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : राज्यातील आघाडी सरकार तीन फांद्याचे झाड आहे. जून महिन्यात राजकीय वादळ येवून हे आघाडी सरकार कोसळेल, असे वक्तव्य केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले आहे.

केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेला प्रशासन चालवता येत नाही. मुख्यमंत्री पद सांभाळणे शिवसेनेचा आवाका नाही. अडीच वर्षांत मुख्यमंत्री फक्त एकदा मंत्रालयात येतात.

दोन तासांत फाईल निकाली काढल्याचे सांगतात यावरूनच त्यांचा प्रशासकीय अनुभव तोकडा असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांना विचारणा केली असता जे भोंगे नियमानुसार नाहीत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, ODI मालिका सुरू असतानाच भारताच्या क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा; वर्ल्डपही खेळला, तर CSK चेही केलं प्रतिनिधित्व

Pune Roads : महिनाभरात पुण्यात २ हजार ९८९ खड्डे बुजविले; १ लाख ८९ हजार चौरस मीटर रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण!

Maharashtra Weather: मुंबईकरांनी काळजी घ्या! समुद्राला मोठी भरती येणार; पण कधी? तारीख सांगत बीएमसीकडून इशारा जारी

Viral Video: मुली कधीच मुलांना प्रपोज का करत नाहीत? रामायणाशी संदर्भ जोडलेलं कारण आलं समोर, पाहा व्हायरल व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : हरवलेल्या १४ वर्षीय बालकाचा शोध, अकोला पोलिसांची विशेष कामगिरी

SCROLL FOR NEXT