Cold 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात थंडीची लाट कायम

सकाळवृत्तसेवा
मध्य महाराष्ट्रात येत्या दोन-तीन दिवसांत पावसाची शक्‍यता
पुणे - उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट कायम आहे. रविवारी नगरमध्ये राज्यातील नीचांकी (4.9 अंश सेल्सिअस) तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोमवार (ता.11) ते बुधवार (ता.13) दरम्यान पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. यामुळे आगामी दिवसांत थंडी कमी होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, राज्यात रविवारही गारठा जाणवत होता. विदर्भाच्या काही भागांत कडाक्‍याच्या थंडीची लाट अद्यापही कायम आहे. तसेच, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातदेखील दिवसभर गारठा जाणवला. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन ते पाच अंश सेल्सिअसने घट झाल्याचे निदर्शनास आले. पुण्यासह नगर, जळगाव, मालेगाव, नाशिक, ब्रह्मपुरी, नागपूर येथे 8 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान नोंदविले गेले. पुण्यातही येत्या दोन ते तीन दिवस आकाश दुपारनंतर अंशत: ढगाळ राहील, असेही हवामानशास्त्र विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

राज्यातील काही प्रमुख शहरांमधील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) -
पुणे-6.2, नगर-4.9, महाबळेश्‍वर-12.2, नाशिक-5.0, सातारा-9.4, मुंबई-16.8, औरंगाबाद-8.4, परभणी आणि बीड-8.5, नागपूर-6.3, वर्धा-10.1

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘ज्ञानेश कुमार यांचा तात्काळ राजीनामा घ्या’; SIR वरून अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप

Asian Games 2026 : अफगाणिस्तान, मलेशिया यांचा विजय; टीम इंडियाला उपांत्यपूर्व फेरीत कोण भिडणार? जाणून घ्या समीकरण

पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत भिंगार बंदची हाक

Latest Marathi News Live Update : निटचा निकाल जाहीर

Mirkarwada Jetty Cleanup : विनावापर नौकांच्या केबिन हटवल्या मिरकरवाड्यात धडक कारवाई; जेटींनी घेतला मोकळा श्वास

SCROLL FOR NEXT