Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: अजित पवार अन् एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर? अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या नाराजीबद्दल स्पष्टच सांगितलं

गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चा

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याच्या काल बातम्या समोर आल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित खात्यांचा अजित पवार यांनी आढावा घेतला. यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

'मी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप केला नाही. अर्थमंत्री म्हणून मी विकास कामांचा, प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो', असं अजित पवार म्हणाले आहेत. ते पुण्यात बोलत होते.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, 'काल अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर अशा अनेक बातम्या समोर आल्या होत्या, वास्तविक असं काही नाही. मी मागे अडीच वर्षे सरकारमध्ये असताना अनेकदा प्रकल्पांच्या १५ दिवसांनी आढावा बैठका घेत होतो. त्या बैठकांमधुन प्रकल्पांना गती द्यायचे काम करायचो, आताही आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही काम करतो' असं अजित पवार म्हणालेत.

पुढे ते म्हणाले की, 'एकनाथ शिंदे यांनी सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी एक कमिटी स्थापन केली आहे. त्याचा आढावा ते घेत असतात. आम्ही सरकारमध्ये महाराष्ट्राचा विकास व्हावा, कामे व्हावी म्हणून आम्ही गेलो, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सरकारमध्ये गेलो, अशातच उद्या मी अर्थमंत्री म्हणून आढावा बैठक घेऊ शकतो. शेवटचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो', असंही अजित पवार म्हणालेत.

दरम्यान आज चांदणी चौक येथे पुलाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार नसल्याचे वृत्त समोर आले होते. त्यावर अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यावर अजित पवारांनी असं काही नसल्याचं सांगितलं आहे. आम्ही सोबत काम करत असल्याचंही पवार म्हणालेत.

अर्थमंत्री म्हणून मी आढावा घेऊ शकतो. फायनल निर्णय मुख्यमंत्र्यांचाच असतो. मोपलवारही बैठकीला होते. पण काहींना वेगळ्याच बातम्या चालवल्या. हे असं झालं, ते तसं झालं. जर राज्याचे प्रश्न, मेट्रोचे प्रश्न मार्गी लागत असेल तर काय अडचण आहे. थोडीशी यंत्रणा हलवली तर कामे होतात असंही पवार म्हणालेत.

सर्वांनी बसलं तर अडचणी मार्गी लागतात. त्यामुळेच मी आढावा घेतला. शेवटी कुणाचंही सरकार असलं तरी मुख्यमंत्रीच त्यावर अंतिम निर्णय घेतात. ही गोष्ट ध्यानात घ्या. लोकांची कामे व्हावेत त्यासाठी आम्ही लक्ष देत आहोत. तुम्ही काम रखडलं तर सांगा. आम्ही लक्ष देऊ ना. राज्याचा विकास व्हावा हा आमचा हेतू आहे, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT