Ajit Pawar and Ekanth Shinde  
महाराष्ट्र बातम्या

Cold War : अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यापासून CMसह भाजप आमदार अस्वस्थ; देशमुखांचा दावा

रवींद्र देशमुख

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वॉररूममध्ये बैठक घेतल्यापासून राजकारण तापलं आहे. त्यावर विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याचा दावा केला होता. त्यातच आता शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया आली आहे. देशमुख यांनी सरकारमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा केला आहे.

अनिल देशमुख म्हणाले की, अजितदादांची कामाची पद्धत आक्रमक आहे. सहाजिकच ते उपमुख्यमंत्री झाल्यामुळे एकनाथ शिंदेंना सेटबॅक मिळाला आहे. सध्याचं सरकार तीन तिघाडा काम बिघाडा सुरू आहे. भविष्यात काय होईल, ते सांगता येत नाही, पण अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून मुख्यमंत्री शिंदे, त्यांच्यासोबत गेलेले आमदार आणि भाजपचे आमदारही अत्यंत अस्वस्थ आहेत. सरकारमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.

आमचे १०५ आमदार असून आम्हाला किती मंत्रीपद मिळाली, या नाराजीतून भाजप आमदार अस्वस्थ आहे. हे सर्वांना ठावूक असल्याचं देशमुख यांनी नमूद केलं.

नवाब मलिक यांना जामीन मिळताच, देशमुख म्हणाले की, 'सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही हो सकता. आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन देत सत्याचा विजय केला आहे. नवाब मलिक विरोधात षडयंत्र करत त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. पण सर्वोच न्यायालयाने सत्याच्या बाजूने निर्णय दिल्याचं देशमुख म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT