2000 rupee note Esakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर जिल्ह्यातून दोन हजाराच्या १३.६८ लाख नोटा जमा! नोटा बदलण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत; ऑक्टोबरपासून नोट चालणार नाही

दोन हजार रुपयांची नोट १ ऑक्टोबरपासून चलनातून बाद होणार आहे. नोटा बदलून घेण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. दरम्यान आतापर्यंत सोलापूर शहर-जिल्ह्यातून २७३ कोटी ६४ लाख ३० हजार रुपये (१३ लाख १८ हजार २१५ नोटा) बॅंकांमध्ये जमा झाले आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : दोन हजार रुपयांची नोट आता १ ऑक्टोबरपासून चलनातून बाद होणार आहे. नोटा बदलून घेण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. दरम्यान, आतापर्यंत सोलापूर शहर-जिल्ह्यातून २७३ कोटी ६४ लाख ३० हजार रुपये (१३ लाख १८ हजार २१५ नोटा) बॅंकांमध्ये जमा झाले आहेत.

‘आरबीआय’ने १९ मे रोजी दोन हजारांची नोट चलनातून बाद करण्यासंदर्भातील निर्णय जाहीर केला. नोटाबंदीनंतर नोव्हेंबर २०१६मध्ये दोन हजार रुपयांची नोट चलनात आली होती. दोन हजारांच्या नोटांची छपाई झाली, पण त्या नोटा चलनातून कमी झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना जूनपासून दररोज दहा नोटा बदलून घेण्याची मर्यादा घालून देण्यात आली. आजवर सोलापूरच्या एसबीआय व बॅंक ऑफ इंडियाच्या ट्रेझरीत २७ सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या २७३.६४ कोटींच्या नोटा जमा झाल्या आहेत. बहुतेक लोकांनी त्यांच्याकडील नोटा बॅंकांमध्ये यापूर्वीच जमा केल्या आहेत. आता नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी तीन दिवस शिल्लक राहिले आहेत, पण त्यातील दोन दिवस बॅंका बंद असणार आहेत.

...नाहीतर आर्थिक नुकसान होईल

वेळेत तुम्ही तुमच्याकडील दोन हजाराच्या नोटा बदलवून घेतल्या नाहीत, तर ३० सप्टेंबरनंतर त्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत. त्यातून मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. काही दिवसांपासून बँकांमध्ये दोन हजारांच्या नोटा जमा करण्याचे प्रमाण कमी असून दिवसाला एक- दोन नोटा जमा होत आहेत.

- प्रशांत नाशिककर, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, सोलापूर

जमा झालेल्या नोटांची स्थिती

  • एसबीआय

  • ७७,०४,३०,०००

  • बॅंक ऑफ इंडिया

  • १९६.६० कोटी

  • एकूण

  • २७३,६४,३०,०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT