The Maharashtra State Cooperative Bank Sakal
महाराष्ट्र बातम्या

जिल्हा सहकारी बँकांची आज पुण्यात परिषद

‘सकाळ माध्यम समूह’ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात शनिवारी (ता. २६) राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या परिषदेचे आयोजन केले आहे.

प्रशांत पाटील

पुणे - ‘सकाळ माध्यम समूह’ (Sakal media Group) आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात शनिवारी (ता. २६) राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या परिषदेचे (State District Central Bank Conference) आयोजन केले आहे. यात जिल्हा बँकांच्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत विस्तृत चर्चा होणार आहे. (Conference of District Coperative Banks in Pune Today)

बाणेर रस्ता येथील ‘यशदा’च्या सभागृहात सकाळी दहा वाजता या परिषदेस प्रारंभ होईल. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, ‘नाबार्ड’चे मुख्य महाव्यवस्थापक गोवर्धनसिंग रावत आणि राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांचे मार्गदर्शन होणार आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या त्रिस्तरीय वित्तीय रचनेत जिल्हा सहकारी बँकांचे महत्त्वाचे स्थान आहे. देशातील केरळसह काही राज्यांनी जिल्हा सहकारी बँकांचे विलीनीकरण राज्य सहकारी बँकेत करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकांच्या विलिनीकरणाबाबत मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. सहकारी त्रिस्तरीय रचनेतील जिल्हा सहकारी बँकांचे स्थान अबाधित राहावे, हा परिषदेच्या आयोजनामागील उद्देश आहे.

या परिषदेसाठी सहकार विभागातील तज्ज्ञ आणि सर्व जिल्हा सहकारी बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या वेळी जिल्हा बँकांच्या अडचणींबाबत चर्चा होऊन त्यातील निष्कर्षानंतर उपाययोजनांबाबत नाबार्ड, राज्य आणि केंद्र सरकार यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT