Rashtravadi Congress eSakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Political Crisis : नक्की आदेश कोणाचे पाळायचे पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम; बडतर्फीचा आदेश देणारेच निलंबित

Ajit Pawar Latest Update : राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि त्यातही पवार विरुद्ध पवार असाच वाद अनुभवायला मिळत आहे. या वादाचे पडसाद आता थेट अकोला शहरापर्यंत पोहोचले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Akola Rashtravadi News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असा वाद सुरू झाला आणि पक्षाचे अकोला जिल्ह्यातही दोन गट पडले. आमदार व महानगराध्यक्षांचा एक गट तर जिल्हाध्यक्षांसह ज्येष्ठ नेत्यांचा दुसरा गट.

या वादात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अकोला महानगराध्यक्ष विजय देशमुख यांना पक्षातून बडतर्फ करण्याचा आदेश दुपारी काढला.

त्यानंतर सायंकाळपर्यंत आदेश काढणारे जयंत पाटील यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करीत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे आता आदेश कुणाचा मानावा असा प्रश्न पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पडला आहे.

राज्याने राजकारणात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा वाद वर्षभरापूर्वी अनुभवला. वर्षभर त्यावर मंथन चाचले.

हा वाद अद्याप सुरू असतानाच आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि त्यातही पवार विरुद्ध पवार असाच वाद अनुभवायला मिळत आहे. या वादाचे पडसाद आता थेट अकोला शहरापर्यंत पोहोचले आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजित पवार यांचे उघड समर्थन करणारे अकोला महानगराध्यक्ष विजय देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आले असल्याचा आदेश जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष या नात्याने सोमवारी दुपारी काढला.

हा आदेश सोशल माध्यमांवरून व्हायलरही झाला. त्याची लेखी प्रत अकोल्यात पोहोचण्यापूर्वीच अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन कार्यकारीणी जाहीर केली.

सायंकाळी ही नवीन कार्यकारीणी जाहीर करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पदावरून दूर करीत खासदार सुनील तटकरे यांना नवीन प्रदेशाध्यक्ष जाहीर करण्यात आले.

सोबतच जयंत पाटील यांना निलंबित करण्यात येत असल्याचे खुद्द अजित पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे जयंत पाटील यांनी काढलेला आदेश मानावे की नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.

चालत्या गाडीत बसा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना

प्रशासकीय कामात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तोड नाही. कार्यकर्त्यांची कामे करताना मनात किंचतही किंतू परंतू न ठेवता काम करणारे, अशी अजितदादांची सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये ओळख आहे.

त्यामुळे अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेताच सर्व सामान्य कार्यकर्त्यांनाही आता लोकांची कामे करून घेता येतील, अशी आशा निर्माण झाली आहे.

त्यामुळे चालत्या गाडीत बसा, अशीच काहीशी भावना अकोला शहरातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये या सर्व राजकीय घडामोडीत दिसून आली.

अजितदादांच्या ‘टीम’मध्ये अकोल्याला स्थान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा करीत नवीन कार्यकारीणी जाहीर केली. खासदार सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष जाहीर केले. त्यांच्या नवीन ‘टीम’मध्ये अकोल्यालाही स्थान मिळाले आहे.

अजितदादांचे निकटवर्तीय विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांना प्रदेश प्रवक्तेपदावर नियुक्त करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran political Crisis: इराणमध्ये संघर्षाचा पेच कायम; नेत्यांना मारण्याचे विपरित परिणाम होण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

MP EOW Controversy : एक वर्षाच्या बालकावर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेचा पराक्रम

Chhatrapati Sambhajinagar News: अवकाळी पावसाचा मोठा फटका; हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

PM Kisan 22nd Installment : 'पीएम किसान'चे 93 कोटी खात्यात जमा झाले, पण 'या' चुकीमुळे 11 हजार शेतकऱ्यांचे पैसे अडकले; त्वरित करा हे काम!

SCROLL FOR NEXT