CM Eknath shinde and devendra fadanvis Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोनस जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन !

बोनससाठी स्पष्ट नकार देणा-या अजित पवारांचा खरा चेहरा उघड : सुधीर मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा

धान उत्पादक शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रति हेक्टरी १५ हजार रु या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्याची घोषणा केल्याबद्दल वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.

गेल्या सरकारचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी विधानसभागृहात धानाला बोनस देण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला होता आणि या सरकारने धानाला बोनस जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे . विद्यमान सरकार हे खरे शेतकऱ्यांचे हित जोपासणारे सरकार असल्याचे सिद्ध झाले असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे धान उत्पादक जिल्ह्यातील ५ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. ही बोनसची रक्कम ऑनलाइन पद्धतीने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.केंद्र शासनाने राज्याला १५ लाख मेट्रिक टन धान खरेदीसाठी मंजुरी दिली आहे. हा निर्णय शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय आहे.

सातत्याने आर्थिक हालअपेष्टा सहन करणाऱ्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला महाविनाश आघाडीने सतत पाने पुसली पण आमच्या सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार दिला असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तृत्वशून्य नेत्यांना भोंदूबाबांचा आधार, हे नेते भोंदू; ठाकरेंचा टोमणा कुणाला? पाण्याच्या मुद्द्यावरही बोलले

IPL 2026 Marathi News: विराट कोहलीचा प्रतिस्पर्ध्यांना 'धडकी' भरवणारा Video; भाईचा विषयच हार्ड, षटकाराशिवाय नावच नाही

Bangkok Return Youth Death : बँकॉकहून परतलेल्या तरुणाचा शौचालयाच्या छतावर नग्न अवस्थेत मृतदेह; हातात कंडोमचं पाकीट, झाडावर टांगलेले कपडे, तोंडातून येत होता फेस!

सोन्यामध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची, युद्धामुळे सोन्याचे भाव कमी होणार; तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : पंढरपुरात वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागेचे नुकसान

SCROLL FOR NEXT