shivsena esakal
महाराष्ट्र बातम्या

गनिमी काव्याने आलेल्या अतुल लोंढेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

पोलिसांनी सागर बंगल्याकडे जाणारे रस्ते दोन्ही बाजूने बंद केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मागील काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभेत केलेल्या भाषणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरात कॉंग्रेस पक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पंतप्रधानांनी केलेले विधान महाराष्ट्राची बदनामी करणारं असून त्यांनी माफी मागायला हवी अशी भूमिका राज्यातील काँग्रेसनेत्यांनी घेतला आहे. गेल्या आठवड्यात नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारे आंदोलन केले होते.

दरम्यान, राज्यातील प्रमुख भाजपा नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करु असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्याबाहेर आज काँग्रेस कार्यकर्ते पोहचले आहेत. त्याचवेळी काँग्रेस प्रवक्ते गनिमी काव्याने आलेल्या अतुल लोंढेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात घेत तोंडही दाबलं आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणखीनच आक्रमक झाले. यावेळी त्यांनी आंदोलनाचा इशारा घेतला. दरम्यान, भाजपा कार्यकर्तेही फडणवीसांच्या घराबाहेर जमले. भाजपा कार्यकर्त्यांचीही पोलिसांना धरपकड सुरु केली आहे. पोलिसांनी सागर बंगल्याकडे जाणारे रस्ते दोन्ही बाजूने बंद केले आहे. या परिसरात आंदोलन सुरु असून कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काय म्हणाले आहेत नाना पटोले

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत कसे भाषण करतात? त्यांना जनता कधीही माफ करणार नाही. मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, तेव्हा भाजपाचे सदस्य बाके वाजवत होते. आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या घरापुढे आंदोलन करणारच. नरेंद्र मोदी यांनी माफी मागायला हवी अशी आमची मागणी आहे असं नाना पटोले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT