महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : आघाडीच्या अस्तित्वाची लढाई!

ॲड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील

विधानसभा 2019 
नगर जिल्ह्यात महायुतीच्या वर्चस्वाचा विडा विखे-पाटलांनी उचललाय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे लढती चुरशीच्या होतील.

विधानसभा निवडणुकीअगोदरच जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी झाले. भाजपला बळकटी मिळाली. विखे पाटलांनी जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत महायुतीचेच उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधल्याने भाजपच्या गोटात उत्साह आहे. काँग्रेसची मदार प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावरच आहे. ही निवडणूक महायुतीच्या प्रतिष्ठेची आणि आघाडीच्या अस्तित्वाची ठरेल, असे चित्र आहे.

नगर शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप संभ्रमात आहेत. महायुतीकडे त्यांचे लक्ष आहे. युती न झाल्यास त्यांना भाजपचा पर्याय खुला दिसतो. मात्र, महायुती झाल्यास जगतापांना आघाडीच्या कोट्यातूनच रिंगणात उतरावे लागेल. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची उमेदवारी निश्‍चित असल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. तथापि, भाजपचे नेतेही आक्रमक असल्याने शिवसेना ‘गॅस’वरच आहे.

पारनेरमधून विधानसभेचे उपाध्यक्ष आणि शिवसेना नेते विजय औटींची उमेदवारी निश्‍चित आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाने विश्‍वनाथ कोरडे, वसंत चेडे, अश्‍विनी थोरात यांच्याही आशा पल्लवित झाल्यात. राष्ट्रवादीचे नेते सुजित झावरे यांचे भाजपचा मार्ग स्वीकारण्याचे संकेत असून, राष्ट्रवादीकडून नीलेश लंके व प्रशांत गायकवाड हे प्रबळ दावेदार मानले जातात.

श्रीगोंदा, जामखेडला चुरस
श्रीगोंद्यातून गेल्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठिंब्यावर माजी मंत्री बबनराव पाचपुतेंचा पराभव करीत राहुल जगताप या नवख्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारकी पटकावली. या वेळी पाचपुतेंना भाजपची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. शिवाय, खुद्द जगताप आणि काँग्रेसच्या नेत्या अनुराधा नागवडे हेही भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. कर्जत-जामखेडची लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. पालकमंत्री राम शिंदेंपुढे राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. वंचित आघाडीलाही येथून अपेक्षा आहेत.

पाथर्डी-शेवगावमधून भाजपची उमेदवारी पुन्हा आमदार मोनिका राजळे यांना मिळू नये, यासाठी निष्ठावंतांचा आटापिटा आहे. राष्ट्रवादीतर्फे ॲड. प्रताप ढाकणे रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून, माजी आमदार चंद्रशेखर घुले ऐनवेळी अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील, असे बोलले जाते. नेवाश्‍यात शंकरराव गडाख यांनी शेतकरी क्रांतिकारी पक्षातर्फे तयारी चालविली आहे. भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पक्षांतर्गत इच्छुकांचा सामना करावा लागतोय.

राहुरीमधून आमदार शिवाजी कर्डिले यांना डावलून देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्यासाठी संघपरिवार व भाजपच्या निष्ठावंतांनी कंबर कसली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीकडून तयारी चालवली आहे. श्रीरामपूर या राखीव मतदारसंघात काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवबंधन बांधले. त्यामुळे काँग्रेसतर्फे येथून हेमंत ओगले यांनी तयारी चालवली आहे. कांबळेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतरही भाजपने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले आहे. निवृत्त अधिकारी रामचंद्र जाधव आणि लहू कानडे हेही लढण्याच्या तयारीत आहेत. शिर्डीमधून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारीच्या मागणीचा ठराव राहाता तालुका काँग्रेस समितीने केलाय. दुसरा कोणीही प्रबळ उमेदवार काँग्रेसकडे नाही. शिवसेनेतर्फे कमलाकर कोते व राष्ट्रवादीतर्फे नीलेश कोते येथील दावेदार मानले जातात. कोपरगावातून भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे आणि अपक्ष लढण्याच्या मानसिकतेतील राष्ट्रवादीचे युवानेते आशुतोष काळे यांची परंपरागत लढत होईल.

संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात आज तरी सक्षम उमेदवार नाही. मंत्री विखे यांच्या पत्नी शालिनी येथून लढतील, अशी चर्चा आहे. तसे झाले तर निवडणूक रंगेल; अन्यथा थोरात यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होईल. अकोल्यातून राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेले आमदार वैभव पिचड यांना आदिवासी राज्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न दरवेळी असफल होतो. या वेळी तो यशस्वी झाला नाही तर निवडणूक अक्षरशः एकतर्फी होईल, यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT