अतुल लोंढे
अतुल लोंढे  
महाराष्ट्र

'बंगल्यावर आलात तर परत जाणार नाही म्हणालात, मी येऊन गेलो पण तुम्ही..'

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभेत केलेल्या भाषणाचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरात कॉंग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पंतप्रधानांनी (PM Modi) केलेले विधान महाराष्ट्राची (Maharashtra) बदनामी करणारं असून त्यांनी माफी मागायला हवी अशी भूमिका राज्यातील काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आज आंदोलन करण्यात आले. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते गनिमी काव्याने आलेल्या अतुल लोंढेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात घेत तोंडही दाबलं आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणखीनच आक्रमक झाले आहेत. (congress allegations)

आता यावर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'सागर' लाड तुम्ही आव्हान दिले होते. तुमचे आव्हान स्वीकारून मी सागर बंगल्यावर पोहोचलो आहे. महाराष्ट्र द्रोह्यांचा निषेध केला. पोलिसांनी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला तरीही एकदा नाही तर अनेकदा महाराष्ट्रद्रोह्यांचा निषेध केला. तुम्ही म्हणाला होता सागर बंगल्यावर आलात, तर परत जाऊ देणार नाही. मी परतही आलो पण तुम्ही काही दिसला नाहीत, असा खोचक टोमणा त्यांनी लगावला आहे.

आजच्या आंदोलनात भाजपा (BJP) कार्यकर्तेही फडणवीसांच्या घराबाहेर जमले. काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते आमने सामने आल्याने काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी कार्यकर्तेही आक्रमक झाल्याने पोलिसांसोबत त्यांनी झटापटही झाली. भाजपा कार्यकर्त्यांचीही पोलिसांना धरपकड सुरु केली आहे. पोलिसांनी सागर बंगल्याकडे जाणारे रस्ते दोन्ही बाजूने बंद केले आहे. या परिसरात आंदोलन सुरु असून कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : 'जम्मू'मधून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केंद्राचा 'बिग प्लॅन', डोवाल यांच्या उपस्थितीत अमित शाहांची उच्च स्तरीय बैठक

T20 World Cup 2024 Super 8 : स्कॉटलंडचे स्वप्न भंगले! ऑस्ट्रेलियाच्या विजयाची साहेबांच्या ताफ्यात पार्टी; इंग्लंडला मिळाले सुपर-8चे तिकीट

In Revised NCERT Textbook: 'बाबरी मशिदीचे नाव गायब! NCERTच्या नवीन पाठ्यपुस्तकात अयोध्या वादाचं पुनर्लेखन

Rohit Pawar: रोहित पवारांना मिळणार पक्षात महत्वाची जबाबदारी? विधानसभेच्या तोंडावर महत्वाचं पद देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न?

David Wiese Retires : टी-20 वर्ल्ड कपमधून संघ बाहेर पडताच दिग्गज खेळाडू घेतली निवृत्ती!

SCROLL FOR NEXT