महाराष्ट्र बातम्या

Vidhan Parishad Election: विधानपरिषदेसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला; या नावावर केलं शिक्कामोर्तब

Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या एका उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने विधानपरिषद उमेदवारी जाहीर केली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या एका उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने विधानपरिषद उमेदवारी जाहीर केली आहे. याआधी प्रज्ञा सातव यांच्या नावाची चर्चा पक्षात सुरू होती. गेल्या काही दिवसांमध्ये विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षात काही नावांची चर्चा सुरू होती. त्यामध्ये मुस्लीम चेहऱ्याला संधी देऊ शकतं अशी देखील चर्चा सुरू होती.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस बाकी असताना प्रज्ञा सातव यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केलेलं आहे. प्रज्ञा सातव या दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव लोकसभेवर निवडूण गेलेल होते. त्यांचं संघटनेत देखील मोठं काम होतं. राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे होते.

याआधी काँग्रेसचे दिवंगत विधान परिषदेचे आमदार शरद रणपिसे यांच्या रिक्त जागेवर प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. कोरोना संसर्गामुळे काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांचे अचानक निधन झाल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली होती.

भाजपकडून विधानपरिषदेची यादी जाहीर

भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठीची ५ नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपमध्ये विधानपरिषदेसाठी अनेकजण इच्छुक होते. पण अखेर भाजपाने बीड लोकसभा मतदारसंघाच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. भाजपने नुकतंच एक परिपत्रक काढत या पाच नेत्यांच्या नावाची घोषणा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्रात धक्कादायक घटना; भाजप मंत्र्यांच्या भावाला अन् पुतण्याला मारहाण, Video समोर आल्यानंतर खळबळ

Viral Video: 'बॉम्बे पंजाबच्या खूप मागे... ' शिवम दुबेचा पतंग कापत अभिषेक शर्माने उडवली खिल्ली

Latest Marathi News Live Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, शेकडो किलो पनीर जप्त

Pune FDA Action : पुण्यात चार ट्रक संशयित खवा, पनीर जप्त; एफडीएची गणेशोत्सवापूर्वी मोठी कारवाई!

Kolhapur Infrastructure: टोपचा उड्डाणपूल अडकला ठेकेदारांच्या वादात; सहापदरी कामाकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष; नव्या निविदेमुळे काम आणखी लांबणार

SCROLL FOR NEXT