congress connection with Maharashtra during rahul gandhi bharaj jodo yatra political history
congress connection with Maharashtra during rahul gandhi bharaj jodo yatra political history  
महाराष्ट्र

Rahul Gandhi: धडपडणाऱ्या कॉंग्रेसला कायमचं महाराष्ट्राची साथ! जाणून घ्या गांधी घराण्याचं खास नातं

अक्षता पांढरे

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेला मोठा प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे. दरम्यान राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्यामुळे हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत. आजची शेगावमध्ये झालेली सभा बघून कॉंग्रेसच्या या यात्रेला पुन्हा एकदा चांगला बूस्ट मिळालेला पाहायला मिळतोय. पण तुम्हाला माहितेय का गांधी घराणं आणि महाराष्ट्राचं एक खास कनेक्शन आहे. हे नेमकं काय कनेक्शन आहे ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

भाजप जरी म्हणत असेल की, काँग्रेसचं अस्तित्व संपलं आहे. तरी महाराष्ट्रात आजही इंदिरा गांधींना आणि गांधी घराण्याला मानणारा मोठा वर्ग आहे. याआधी जेव्हा जेव्हा काँग्रेसला धक्का बसलाय तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने आणि खास करून मराठवाड्याने काँग्रेसला उभारी दिलीये, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.  याबद्दल विस्ताराने सांगयचे झाल्यास महाराष्ट्राच्या निर्मितीत इंदिरा गांधी यांचा मोठा वाटा आहे.  

कसं काय? तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर देशात भाषेच्या आधारे वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली. वास्तविक अनेक राज्ये "राज्य पुनर्रचना कायदा" 1956 अंतर्गत निर्माण झाली. या कायद्याच्या आधारे कन्नड भाषा बोलणाऱ्या लोकांना कर्नाटक राज्य देण्यात आले. तेलुगू भाषेतील लोकांना आंध्र प्रदेश राज्य मिळाले. त्याच वेळी मल्याळम भाषेच्या लोकांना केरळ आणि तमिळ भाषेच्या लोकांना तामिळनाडू राज्य मिळाले. पण मराठी आणि गुजराती लोकांना स्वतःचे वेगळे राज्य मिळाले नाही. त्यामुळे वेगळ्या राज्यांसाठी त्यांची मागणी जोर धरत होती. 

हेही वाचा - का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

महाराष्ट्र निर्मीतीत इंदीरा गांधींचे योगदान

दरम्यान पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी इंदिरा गांधी या नेहरूंचा सांभाळ करत होत्या. त्यावेळी पंडित नेहरूंकडे येणारी कोणत्याही पत्र, आवेदन, मागणी आधी इंदिरा गांधी नजरेतून जायची. या दरम्यान इंदिरा गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष बनल्या. यातच महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या निर्मिती चा प्रस्ताव इंदिरा गांधी यांच्याकडे आला.  या मागणीला धरून देशात अनेक आंदोलनेही झाली. त्यामुळे भाषिक वाद टाळण्यासाठी त्यांनी वेगळ्या महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या निर्मिती चा प्रस्ताव पारित करण्यात पाऊल उचलले. आणि अखेर 1 मे आणि 1960 ला स्वतंत्र महाराष्ट्र राज्य उदयास आले. 

तेव्हाही महाराष्ट्रच तारणहार ठरला

यांनतर अजून एक घटना सांगायची झाली तर, आणीबाणीनंतर काँग्रेसची अवस्था आपल्या सगळ्या माहितेय, १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्ष सत्तेत आला आणि काँग्रेस विरोधी बाकावर जाऊन बसले, पण इंदिरा गांधी आणि संजय गांधी सुद्धा या निडणुकीत आपटले. पण यावेळी महाराष्ट्र तारणहार ठरला. कारण या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला असताना जे बोटावर मोजण्याइतके खासदार निवडणून आले त्यात सर्वाधिक २० खासदार महाराष्ट्रातले होते.   

यानंतर १९ एप्रिल १९८१ ज्या ठिकाणी आपल्या राज्याचे कायदे तयार होतात त्या विधानभवनाचे उदघाटन इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले होते. ते सुद्धा मराठी थाटात नऊवारी साडी आणि डोक्यावर पदर घेऊन. 

सोनियांच्या राजकारणाचा श्रीगणेशा इथूनच

एवढंच नाही सोनिया गांधीचा राजकारणाचा श्रीगणेशा महाराष्ट्रातून झाला होता. सोनिया गांधी औपचारिकपणे राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांची पहिली सर्वसाधारण सभा महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यातच झाली होती. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, आजही महाराष्ट्रतल्या अनेक ठिकाणी इंदिरा गांधी या नावामुळे काँग्रेसला मत मिळतात.  

काँग्रेसला पुन्हा सुगीचे दिवस येणार?

पण गेल्या काही वर्षात मोदींच्या लाटेमुळे म्हणा किंवा काँग्रेस अध्यक्षांच्या दुर्लक्षपणामुळे महाराष्ट्रातून काँग्रेसची हवा धूसर झाली. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्ये आणि मोठे नेतेमंडळी सुद्धा भाजप किंवा इतर पक्षात जाताना पाहायला मिळाले. त्यामुळे महाराष्ट्रातून काँग्रेस संपली  असं चित्र तयार झालं. पण राहुल गांधी यांच्या सध्याच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातून मिळणार प्रतिसाद पाहून  काँग्रेसला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येणार असं दिसतंय. या भारत जोडो यात्रेमुळे महाराष्ट्रातील काँग्रेसचे हिरमुसले चेहरे पुन्हा खुललेले पाहायला मिळत आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT