nana patole and balasaheb thorat sakal
महाराष्ट्र बातम्या

'त्या' पाच नॉटरिचेबल आमदारांबद्दल काँग्रेसचे स्पष्टीकरण

नार्वेकर आणि फाटक शिंदेंच्या भेटीसाठी गेलेले असतानाच संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना खळबळजनक खुलासे केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह साधारण 35 आमदार नॉटरिचेबल असतानाच काँग्रेसचेदेखील पाच आमदार नॉटरिचेबल असल्याचा चर्चा समोर आल्या होत्या. त्यामुळे राज्यात अनेक चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, या सर्व चर्चांमध्ये महाराष्ट्र काँग्रेसकडून ट्वीट करत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (Congress On Not Reachable MLA )

काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच काही आमदार नॅाट रिचेबल असल्याच्या बातम्या चुकीच्या, दिशाभूल करणा-या व असत्य असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे शिंदेसह नॉटरिचेबल असणारे आमदारांनी राज्य सरकारचे टेन्शन वाढवलेले असताना काँग्रेसचे कोणतेही आमदार नॉटरिचेबल नसल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या राज्यात सुरू असलेल्या अनेक चर्चांना काहीसा ब्रेक लागला आहे.

"मला शिंदेंचा नाईलाज माहित आहे" - संजय राऊत

नार्वेकर आणि फाटक शिंदेंच्या भेटीसाठी गेलेले असतानाच संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना खळबळजनक खुलासे केले आहेत. मला एकनाथ शिंदेंचा नाईलाज माहित आहे. मी त्यांच्याशी बोलायचो. आमच्यावरही ईडीने दबाव आणला. पण म्हणून आम्ही पक्ष सोडला नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. तसंच शिवसेनेच्या आमदारांंचं अपहरण करुन त्यांना मारहाण करण्यात आली. त्यातच नितीन देशमुखांना हृदयविकाराचा झटका आला, असंही संजय राऊतांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो-धो! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; पुणे-रायगडला 'रेड अलर्ट', मुंबईसह 26 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Police Transfer: पोलिसांत मोठा फेरबदल! १२५ डीएसपी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी, कुणी घेतला निर्णय?

Pune News: मोठी दुर्घटना टळली! कुसगाव खिंडीत दरड कोसळल्याने राजगड–हवेली मार्गावरील वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने हटवला अडथळा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाची संततधार; घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’

Pune Water Crisis: पुण्याची पाणीचिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीतील साठा गतवर्षीपेक्षा पाचपट कमी; केवळ ७६ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक

SCROLL FOR NEXT