Harshvardhan Patil 
महाराष्ट्र बातम्या

'इंदापूरबाबत शरद पवारांशी सकारात्मक चर्चा; आता हर्षवर्धन पाटलांनी ठरवावे'

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : इंदापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने नाराज असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी मेळावा घेत भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिल्याने काँग्रेस हायकमांड धास्तावले आहे. इंदापूरच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सकारात्मक चर्चा झाल्याचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे, की इंदापूर जागेसंदर्भात शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. परंतू, हर्षवर्धन पाटील ‘नॉट रिचेबल’ असल्यामुळे संपर्क होऊ शकत नाही. परंतु आता काय करायचं ते हर्षवर्धन पाटील यांनी ठरवायचे आहे. मी सकाळपासून हर्षवर्धन यांना फोन करतोय पण मोबाईल बंद येतोय. म्हणून मीडियाच्या माध्यमातून हर्षवर्धन यांना आवाहन करतोय.

इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची दगाबाजी व काँग्रेस नेत्यांच्या हतबलतेमुळे व्यथित झालेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर विराट सभेस कौल मागितला आणि सभेने त्यांना भाजपमध्ये जाण्याचा कौल दिला. त्यांनीही हा कौल मान्य करून भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले. तसेच, येत्या मंगळवारी (ता. 10) निर्णय घेण्याची घोषणा केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT