Ashok Chavhan  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार, लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये होणार मोठा भूकंप?

येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात सत्तांतर झाल्यापासून महाविकास आघाडीतील पक्षांतील अनेक नेते, मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सत्तांतर करताना दिसून येत आहेत. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.

येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असून तशा हालचाली सुरू आहेत, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार बसणार असल्याचं दिसून येत आहे. संजय शिरसाट यांनी आतापर्यंत ज्या ज्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. ते खरंच ठरलं आहे. त्यामुळे त्यांच्या या दाव्याकडे राजकीय वर्तुळातून नेते गांभीर्याने पाहत आहेत.

संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे. काँग्रेसमध्ये एक वाक्यता नाही. अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांचं जमत नाही. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांचं जमत नाही. मला तरी असं वाटतं आहे की अनेक दिवसांपासुन ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यानुसार अशोक चव्हाण हे लोकसभेपूर्वी भाजपमध्ये जातील असं माझं मत आहे असं संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे.

एवढा मोठा नेता असून त्यांना काँग्रेसमध्ये बरोबर वागणूक मिळत नाही. ते निश्चितच भाजपमध्ये जातील. तसेच प्रयत्न चालू आहेत. अनेक घडामोडी तशा सुरू आहेत. बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार नाहीत. कारण विखे आणि थोरात यांचं विळ्या भोपळ्याचं नातं आहे. विखे पाटील जर काँग्रेसमध्ये गेले तर थोरात भाजपमध्ये जातील. असं त्यांचं उलटंपालटं गणित आहे. पण अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याची मानसिकता तयार केली आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT