Balasaheb Thorat 
महाराष्ट्र बातम्या

Balasaheb Thorat : "खोक्यावर खोके, एकदम ओके", काँग्रेसनेते बाळासाहेब थोरातांचा सरकारला खोचक टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या गोंधळाने सर्वसामान्य मतदार देखील संभ्रमात आहे. जे सरकारवर कडाडून टीका करायचे, तेच अचानक सरकारमध्ये सामील होतात. त्यानंतर विरोधात शिल्लक असलेल्या पक्षांवर हल्लाबोल करतात. विशेष म्हणजे, जे आधीच्या सरकारमध्ये मंत्री होते, तेच आधीच्या सरकारवर टीका करतात. अशा परिस्थितीत उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत असून अधिवेशनापूर्वी काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, हे सरकार बनलं आणि शिंदेंच्या आमदारांना डावलून राष्ट्रवादीला मंत्रीपद दिली गेली. मंत्रामंडळ विस्ताराच्या गडबडीत सरकारचं राज्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. तातडीच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. कांद्याला साडेतीनशे रुपये अनुदान देणार होते. मात्र कांद्याचं अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. तर दुधाला दिलेलं अनुदान पुरेसं नसल्याची खंतही त्यांनी केली.

दरम्यान महागाई प्रचंड वाढली आहे. मॉन्सून नसल्यामुळे त्यात भरच पडली आहे. मागील काही दिवसांपासून अनेक शहरांमध्ये दंगली झाल्या. या गंभीर बाबी आहेत. अधिवेशनात या प्रश्नांवर सरकारला जाब विचारू, असंही थोरात म्हणाले.

सध्या आम्ही संख्येने कमी झालो असलो तर जनतेत आम्ही वाढलो आहे. जनतेची ताकत खरी ताकत असते. ते निवडणुकीत दिसेल. आम्ही मोठ्या संख्येने विधानसभेत निवडून येऊ. गेल्यावेळी ५० खोके एकदम ओके विधानसभेत गाजलं होतं, यावेळी काय असणार असं विचारलं असता, थोरात म्हणाले की, आता खोक्यावर खोके एकदम ओके म्हणावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT