PM Modi Tilak Award Esakal
महाराष्ट्र बातम्या

PM Modi Tilak Award: मोदींना पुरस्कार देणं यात हरकत काय? काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

पंतप्रधान मोदींना टिळक पुरस्कार जाहीर झाल्यानं वाद, काँग्रेसने घेतला आक्षेप

अंकिता खाणे (Ankita Khane)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. हा पुरस्कार मोदींना देण्यावर काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे. याबाबत काँग्रेसच्या पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे. तर याबाबत काँग्रेस नेत्यानेच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. (Latest Marathi News)

काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी याबाबत प्रतिक्रीया दिली आहे. भाई जगताप माध्यमांना प्रतिक्रीया देताना म्हणाले कि, मला याबद्दल जास्त माहिती नाही. राजकीय मतभेद असू शकतात पण, अशा कार्यक्रमाला त्याला एकत्र येण्यावर विरोध का असावा असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. (Latest Marathi News)

तर, हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. लोकमान्य टिळक संस्था काँग्रेस म्हणून कधी काम करत नाही. ती स्वतंत्र संस्था आहे. त्यांनी काय करावं हे काँग्रेस ठरवत नाही. मोदींना पुरस्कार देणं यात हरकत काय आहे. राजकीय मतभेद असू शकतात पण एकत्र यायला काही हरकत नसावी. महाराष्ट्राची वैचारिक अधोगती होतेय हे खरंय. राज्य केंद्र सरकारी कार्यक्रम असतील तर सर्व वाद बाजूला ठेवून एकत्रित यावं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असंही भाई जगताप पुढे म्हणालेत.(Latest Marathi News)

काय आहे वाद?

टिळक स्मारक संस्थेकडून दिला जाणारा यंदाचा ४१ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणार आहे. पण टिळक स्मारक संस्थेच्यावतीनं हा पुरस्कार ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला ते रोहित टिळक हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींना पुरस्कार देण्यावरुन पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे. या आक्षेबाबतच पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठवलं आहे.(Latest Marathi News)

कधी दिला जाणार पुरस्कार?

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यातिथीदिनी अर्थात १ ऑगस्ट रोजी दरवर्षी हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला जातो. यंदा देखील १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार पुण्यात देण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. शरद पवारांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT