Congress Leader esakal
महाराष्ट्र बातम्या

Congress Leader: काँग्रेसला आली जाग; हायकमांडचा दिग्गज नेता उद्धव ठाकरेंची भेट घेणार

रुपेश नामदास

महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कुरबूर हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट झाली अचानक झालेल्या भेटीमुळे राजकारणात काही घडणार का अशा चर्चा पाहिला मिळाल्या मात्र भेटी मागील कारण समजू शकलं नाही.

दरम्यान आता काँग्रेस नेते केसी वेणूगोपाल महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ठाकरे-पवार भेटीत कोणत्या विषयावर चर्चा होणार याकडे राज्यचं लक्ष लागून राहिलं आहे. पुढील आठवड्यात ही भेट होणार आहेत. तसेच राहुल गांधी यांची सभा देखील नागपूरमध्ये होण्याची शक्यता आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सावरकर यांच्या विषयी चालू असलेल्या वादावर चर्चा होण्याची शक्यता आहे.उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात काल दीड तास चर्चा झाली, या पार्श्वभूमीवर वेणुगोपाल यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागून आहे.

पवार-ठाकरे भेटीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा शेलारांना फोन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही भाजप नेत्यानी अमित शाह यांना राज्यातील राजकीय परिस्थितीची संपूर्ण माहिती दिल्याची माहीती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT