Yashomati Thakur Threaten Sakal
महाराष्ट्र बातम्या

Yashomati Thakur Threaten : "धारकरी कोथळा बाहेर काढतील" काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना धमकी

दत्ता लवांडे

मुंबई : काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना ट्विटर वरून धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कैलास सूर्यवंशी नावाने असलेल्या ट्विटर हँडल वरून धमकीचे ट्विट करण्यात आले आहे. या प्रकारानंतर यशोमती ठाकूर या थोड्याच वेळात अमरावती पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे धमकीच्या ट्वीटमध्ये?

"दाभोलकर असाच ओरडत होता.. टरटरा फाडून टाकला आणि जन्नत मध्ये पाठवला.. तुमचीही हीच परिस्थिती होईल.. धारकरी कोथळा बाहेर काढतील" असा आशय असलेलं ट्वीट करून धमकी देण्यात आली आहे.

Yashomati Thakur Threaten

"आपल्या तत्वांशी, विचारांशी तडजोड करू नका. लक्षात ठेवा इतिहास गद्दारांचा नाही तर लढणाऱ्यांचा लिहिला जातो. आज इतिहासाने आपल्यावर एक जबाबदारी सोपवलीय. आज जर आपण चुकलो तर हा देश आपल्याला माफ करणार नाही. देशाची लोकशाही टिकवायची असेल तर द्वेष पेरणाऱ्यांना थारा देऊ नका. जय हिंद!" असं ट्वीट यशोमती ठाकूर यांनी केलं होतं. त्यांच्या या ट्वीटला रिप्लाय करताना कैलास सुर्यवंशी या अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली आहे.

मनोहर भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून केला होता निषेध

मनोहर भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या वडिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी पक्षाच्या वतीने राजकमल चौक अमरावती येथे निषेध व्यक्त करून निदर्शने करण्याती आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT