esakal
महाराष्ट्र बातम्या

देशात ऑपरेशन लोटस? काँग्रेसने राज्यांची यादीच शेअर केली

धनश्री ओतारी

राज्यातील सत्तानाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा (Cm Uddhav Thackeray Resign) राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्द्वारे जनतेशी संवादादरम्यान हा मोठा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच, कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राज्यातील राजकीय नाट्यावर प्रतिक्रीया देत त्याचा संबंध अप्रत्यक्षपणे ऑपरेशन लोटस सोबत जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

काही दिवसांपूर्वी, राज्यात महाविकास आघाडी सरकारने नुकतेच अडीच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केले. त्यादरम्यान हे सरकार आता उरलेले देखील अडीच वर्षांचा काळ पुर्ण करेल असे म्हटले गेले होते. तसेच हे कधी जातील हे देखिल भाजपला (BJP) कळणार नाही अशी खोटक टीका देखील करण्यात आली होती. यावेळी कोणतीही प्रतिक्रीया न देता, या आघाडी सरकारमध्येच आलबेल आहे. वेळ आली की महाराष्ट्र पाहील असे भाजपकडून सांगण्यात आलं होतं.

राज्यसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानपरिषदेचा निकाल पुर्णत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात गेला आणि तेथेच भाजपचे ऑपरेशन लोटस (Operation Lotus) सुरू झाल्याचे सिद्ध झाले होते. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

यासर्व पार्श्वभूमिवर कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये राज्यांची यादी जाहीर करत देशात ऑपरेशन लोटस सुरु असल्याची प्रतिक्रिया अप्रत्यक्षपणे दिली आहे.

महाराष्ट्र आणि भारतातील लोकशाहीसाठी दुःखद दिवस! जनतेच्या जनादेशावर पुन्हा प्रलोभन-प्रलोभन-धमकावणे आणि भ्रष्ट राजकीय भ्रष्टाचाराचा बुलडोझर चालवला जातो. असे म्हणत सुरजेवाला यांनी , कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा, उत्तराखंड, अरुणाचल, मणिपूर, मेघालय, महाराष्ट्र... ‘ऑपरेशन लोटस’ झालेल्या राज्यांची यादी जाहीर केली आहे.

तसेच, लोकशाहीशी केलेला विश्वासघात तपासण्यात न्यायालये अपयशी ठरली आहेत.सत्य, नीतिमत्ता, समरसता, प्रगती आणि संविधानासाठी तत्त्वनिष्ठ लढा दिल्याबद्दल माविआ आणि त्यांच्या नेत्यांना सलाम. अशा शब्दात ठाकरेंसह महाविकासआघाडीतील सरकारचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT