Satej Patil Reaction on Punjab Assembly Election 2022 Result  Sakal
महाराष्ट्र बातम्या

'पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता येण्याची आशा होती, पण...', नेत्याचं मोठ वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आज पंजाब विधानसभा निवडणुकीचा (Punjab Assembly Election 2022 Result) निकाल आहे. सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून आम आदमी पक्षाची (AAP) विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू आहे. काँग्रेस हातातील राज्य गमावताना दिसतंय. त्यावरून काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंजाबमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करेल अशी आम्हाला अपेक्षा होती. पण आम्हाला अपेक्षित संख्याबळ मिळाले नाही. त्याबद्दल आत्मपरीक्षण करायला हवे, असं सतेज पाटील म्हणाले. तसेच त्यांनी गोवा निवडणुकीच्या निकालावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. गोव्यात काँग्रेस १६ ते १७ जागांवर आघाडीवर दिसतंय. गोव्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल आणि संख्याबळ पुरेसे नसेल तर इतर पक्षांचा पाठिंबा घेऊ, असं सतेज पाटील म्हणाले.

आतापर्यंत पंजाबमधील स्थिती काय? -

पंजाबच्या एकूण ११७ विधानसभा मतदार संघ असलेल्या पंजाबमध्ये यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ७६, आम आदमी पक्षाने १२, शिरोमणी अकाली दलाने १३, आणि भाजपने ६ जागा जिंकल्या होत्या. तर एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार 'आप'ला यंदा पंजाबमध्ये सत्ता मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं देखील सत्ता आमचीच येईल असा दावा केला आहे. पण, आता पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसला धोबीपछाड देत तब्बल ८९ जागांवर आघाडीवर मिळवली आहे. दोन्ही पक्षातील अंतर जास्त असून काँग्रेसला १४ जागांवर आघाडी मिळवता आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वारंवार पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर टीका केली होती. तसेच चन्नींचा दोन्ही मतदारसंघातून पराभव होईल, असा दावा केजरीवाल यांनी केला होता. त्यानुसार चन्नी दोन्ही मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT