Satyajeet Tambe Daughter Sakal
महाराष्ट्र बातम्या

कौतुकास्पद! राज्यातल्या काँग्रेस नेत्याच्या ८ वर्षांच्या मुलीने केस दान केले...

वडील म्हणून आपल्याला तिचा अभिमान वाटतो अशा शब्दांत या नेत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

वैष्णवी कारंजकर

कॅन्सरच्या रुग्णांसाठी केस दान करण्याचं आवाहन अनेक सेवाभावी संस्थांकडून केलं जात आहे. त्या आवाहनाला जनतेकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातल्या एका काँग्रेस नेत्याच्या ८ वर्षांच्या लहान मुलीनेही आपले केस दान करत समाजाला प्रेरणा दिली आहे.

काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांची आठ वर्षांची मुलगी अहिल्या हिने आपले केस दान केले आहे. सत्यजित तांबे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट करत याविषयीची माहिती दिली आहे. आपल्या मुलीच्या या कृतीबद्दल आपल्याला तिचा अभिमान वाटतो, असंही तांबे म्हणाले आहेत.

आपल्या फेसबुक पोस्टवर सत्यजित तांबे म्हणतात, "कर्करोगाने ग्रस्त लोक, विशेषत: लहान मुलांना, कर्करोगाच्या उपचार आणि थेरपी दरम्यान केस गळणे किंवा अलोपेसियाचा त्रास होतो. ही अत्यंत क्लेशकारक आणि मानसिकदृष्ट्या त्रासदायक गोष्ट असते. पण माझी ८ वर्षांची मुलगी अहिल्या हिचा मला अभिमान वाटतो, की तिने कर्करोगाच्या रुग्णांसाठी निस्वार्थपणे केस दान केले आणि या आजाराशी लढणाऱ्या रुग्णांबद्दल एक आत्मियता व्यक्त केली. एक वडील म्हणून, तिची ही संवेदनशीलता माझी छाती अभिमानाने फुलवतेच पण समाजासाठी आणखी काम करत राहण्याची प्रेरणा देखील देते! एवढेच नाही, तर नवीन पिढी अशा प्रकारे घडताना पाहून माझ्या मनात चांगल्या भविष्याची आशा देखील जागृत झाली आहे".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT