congress leader says we can get together with ncp, shiv sena in local elections also 
महाराष्ट्र बातम्या

स्थानिक निवडणुकांतही 'आम्ही' एकत्र येऊ शकतो; काँग्रेसच्या बड्या नेत्याचे वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : 'राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येऊ शकतात,' असे सूतोवाच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी केले. 

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना थोरात बोलत होते. महायुतीमध्ये दिलेला शब्द भाजपने न पाळल्याने शिवसेनेने मराठी बाणा दाखवून त्यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला, याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे, असे सांगून थोरात म्हणाले, "तिघांनी एकत्र येऊन सरकार करायचे असल्याने आणि पाच वर्षे सरकार चालवण्यासाठी त्यातील बारकावे स्पष्ट करणे गरजेचे आहे. किमान समान कार्यक्रम व्यवस्थित करून काही शंका न ठेवता पुढे जाण्याच्या अनुषंगाने काम सुरू आहे. याबाबत दिल्लीतही दोन-तीन बैठका होतील, अशी अपेक्षा आहे. यात कदाचित चार दिवस जास्त जातील; पण जो निर्णय होईल तो व्यवस्थित होईल.'' 

विधानसभा निवडणुकांचे हिशेब सादर करण्याची मुदत संपत आल्याने बहुतांश आमदार मतदारसंघात असल्याने, आज होणारी राज्यपालांची भेट रद्द करण्यात आल्याची माहिती थोरात यांनी दिली. 

'मी पुन्हा येईन'मुळे रंगत आली... 
"मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' या देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्‍याने राजकारणात रंगत आली. राजकारणात सर्व काही गांभीर्याने घेतले पाहिजे असे नाही. या वाक्‍याचा चांगला उपयोग राजकारण्यांपेक्षा सोशल मीडिया आणि पत्रकारांना झाला. भाजप सरकार पुन्हा येणार असल्याचा फडणवीस यांचा दावा म्हणजे 220 जागा येणार असे म्हणण्यासारखा आहे', असं मत थोरात यांनी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT