so.jpg
so.jpg 
महाराष्ट्र

राधाकृष्ण विखेंना मिळणार कडवी लढत; काँग्रेसकडून यांना उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा

नगर : काॅग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वैर सर्वश्रृत आहे. सध्या विधानसभेचा प्रचार सुरु झाला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात काँग्रेसकडून आमदार सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. सुधीर तांबे यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीच ही माहिती दिली. सुधीर तांबे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आहेत. 

राधाकृष्ण विखे पाटील विधानसभा निवडणूक राहता मतदारसंघातून लढवणार आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात काँग्रेस सुधीर तांबे यांना मैदानात उतरवणार आहेत. युवक काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “राहता मतदारसंघातून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार आमच्या कुटुंबातील असेल. आमदार सुधीर तांबे उभे राहणार आहे,” असे सत्यजित तांबे यांनी सांगितले. सुधीर तांबे हे सध्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत.

दरम्यान, विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. नगरचे खासदार सुजय विखे यांना लोकसभा निवडणुकीत तिकिट न मिळाल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते भाजपमध्ये दाखल झाले. राधाकृष्ण विखे पाटील सध्या राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीला त्यांच्या विरोधात उमेदवार कोण, असा यक्षप्रश्न काँग्रेससमोर होता. सुरुवातीला सत्यजित तांबे, त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांची नावे चर्चेत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : मताधिक्य राखण्याचे दिग्गजांपुढे आव्हान ; दहापैकी सात जागांवर मिळाला होता लाखो मतांनी विजय

World Cupसाठी निवड झालेल्या 15 खेळाडूंची कशी आहे IPL मधील कामगिरी? उपकर्णधार पांड्या ठरतोय फ्लॉप

Latest Marathi News Live Update : दिल्ली अग्निशमन विभागाला 60 हून अधिक फोन; शाळांमध्ये बॉम्ब तपासणी सुरू

Shah Rukh Khan: "तो तर बॉलिवूडचा जावई, मी त्याला तेव्हापासून ओळखतोय, जेव्हा तो.."; किंग खानकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

Gold ETF: ‘ईटीएफ’ देतेय ‘सोन्या’सारखी संधी; गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायामुळे चलती

SCROLL FOR NEXT