ashok chavan ashok chavan
महाराष्ट्र बातम्या

Congress: काँग्रेसमध्ये होणार मोठा बदल; अशोक चव्हाणांना मिळणार मोठी जबाबदारी?

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळातून मोठी माहिती समोर आली आहे. काँग्रेस अशोक चव्हाणांना मोठी जबाबदारी देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

रविवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबनराव तायवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी सुनिल केदार यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवय उंचावल्या आहेत.

अशोक चव्हाण मोठ्या मनाचा माणूस आहे. ते आमचा आधारस्तंभ आहेत. आम्ही त्यांना मोठ्या श्रद्धेने पाहत आलो आहोत आणि पाहत राहू. ते कितीही नाही बोलले तरी आम्ही जबरदस्ती करू. केदार यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात चर्चेला उधाण आलं आहे.

सुनील केदार चव्हाणांना कोणती नवी जबाबदारी देणार आहेत? पटोलेंच्या जागी चव्हाणांना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बनवायचे आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

यापूर्वी झाली होती चर्चा

अशोक चव्हाण यांना अध्यक्ष करण्याच्या चर्चेची पहिलीच वेळ नाही. नुकतेच चव्हाणांच्या नाराजीचे वृत्त समोर आले होते, त्यानंतरही पटोले यांच्याऐवजी चव्हाण यांना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष केले जाऊ शकते, अशी चर्चा जोर धरू लागली. मात्र, भारत जोडो यात्रेनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. दुसरीकडे, केदार यांनी चव्हाण यांच्याबाबत ज्या पद्धतीने कौतुक केले, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उत आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayaji Shinde on Bhimashankar project : "पर्यावरण नष्ट करायला तुम्हाला निवडून दिलंय का?"; कर्जत-भीमाशंकरमधील प्रकल्पावरून सयाजी शिंदे भडकले, १ लाख तरुणांची फौज उतरवण्याचा इशारा!

Manchar News : आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचा आवाज! मंचरचे जैव ऊर्जा तज्ञ ॲड. राहुल पडवळ यांचा नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गौरव

Pune News : मध्यवर्ती पेठांमध्ये दिवसा मालवाहतुकीस बंदी; मालाची चढ-उतार करण्यास रात्री ११ ते सकाळी ९ या वेळेतच परवानगी

Ganja Smuggling : गांजाची तस्करी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला तेलंगणात अटक

Pune News : पक्षकाराची सही, प्रतिज्ञापत्र नसल्याने पोटगीचा दावा फेटाळला; उत्पन्नाचा तपशीलही दिला नाही

SCROLL FOR NEXT