Congress on Sharad Pawar  
महाराष्ट्र बातम्या

Congress on Sharad Pawar : शरद पवारांबाबत काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट! दिल्लीत ठरलं मात्र मुंबईत....

Sandip Kapde

Congress on Sharad Pawar : अदानी प्रकरणाच्या जेपीसी चौकशीच्या मागणीला निरर्थक ठरवून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय खळबळ माजवली होती. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत अंतर्गत कलह वाढला होता. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील शरद पवार यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर शरद पवार यांनी मवाळ भूमिका घेत नवीन वक्तव्य केले. दरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण गौप्यस्फोट केला आहे. 

अदानी समूहावरील आरोपांची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चौकशी करण्याच्या मागणीशी सहमत नसलो तरी विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी त्यांच्या भूमिकेच्या विरोधात जाणार नाही, असे शरद पवार म्हणाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. 

दरम्याम काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्ववीराज चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "दिल्लीत २० पक्षांनी एक सामायिक आघाडी स्थापन केली आणि अदानी प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. सर्वांनी जेपीसीची मागणी केली. मुंबईत आल्यावर शरद पवार यांनी एक वेगळं विधान केले. पण आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत. शरद पवारांनी म्हटलं की १९ पक्षांना JPC हवी असेल तर त्यांना आक्षेप नाही."

शरद पवार खरे बोलले की जेपीसीमध्ये सत्ता पक्षाचे बहूमत असेल पण त्यामध्ये सत्यशोधक होते. याबाबत देशात चर्चा होऊ शकते, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

शरद पवार यांनी यापूर्वी जेपीसी स्थापन केल्यास संसदेतील संख्याबळ पाहता त्यात (समितीत) सत्ताधारी भाजपचे बहुमत असेल आणि त्यामुळे अशा चौकशीच्या निकालावर शंका निर्माण होईल, असे म्हटले होते. मात्र विरोध झाल्यानंतर त्यांनी भूमिका बदलली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Video: ''..त्यांनी माझा इतिहास बघावा, मग धमकी देण्याच्या भानगडीत पडावं'', तुकाराम मुंढेंचा इशारा; व्हिडीओ व्हायरल

Pali News : छायाचित्रणाचा आनंद घ्या, पण ड्रोन उडवून पक्ष्यांचा जीव धोक्यात घालू नका; शंतनू कुवेस्कर यांचा डॉक्युमेंट्रीतून संवर्धनाचा संदेश

Viral Video: जिच्यासाठी उंदीर आणला तिनेच धोका दिला! आपल्या मांजरीला दुसऱ्यासोबत पाहून तुटलं बोक्याचं हृदय; पुढे...

BAN vs AUS 2nd ODI : बांगलादेशने इतिहास रचला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली वन डे मालिका; वर्ल्ड कप विजेत्यांना अक्षरशः रडवले

Latest Marathi News Live Update: गोदावरी स्नानानंतर लाखो भाविकांनी घेतले नाथ समाधीचे दर्शन

SCROLL FOR NEXT