Balu Dhanorkar 
महाराष्ट्र बातम्या

Balu Dhanorkar: खासदार धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक, पण...

धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक

धनश्री ओतारी

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांना रविवारी तातडीने एअर अॅम्बुलन्सने दिल्ली येथे उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.( Congress Mp Balu Dhanorkar Airlifted From Nagpur To Delhi For Treatment )

मागील तीन दिवसांपूर्वी नागपुरातील अरिहंत या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर किडनी स्टोनचा उपचार सुरू होता. संसर्ग वाढल्याने त्यांची प्रकृती खालावली. काही वर्षांपूर्वी दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांच्या आतड्यावर शस्त्रक्रिया झाली होती. याच आतड्याला संसर्ग झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. त्यामुळे उपचारासाठी वेदांता येथे हलविण्यात आले. (Marathi Tajya Batmya)

दोन दिवसांपूर्वी त्यांचे वडील नारायणराव धानोरकर यांचे निधन झाले. भद्रावती येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, खासदार धानोरकर प्रकृती अस्वस्थ असल्याने अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नाही. त्यांना दिल्ली येथे हलविण्यात आले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून सरकारनामाच्या वृत्तानुसार धानोरकर उपचाराला प्रतिसाद देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT