Congress mp balu dhanorkar on NCP moreshwar temurde allegation maharashtra political news  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : राष्ट्रवादी अन् काँग्रेसमध्येच जुंपली! NCP च्या आरोपांना धानोरकरांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मोरेश्वर टेमुर्डे यांनी राज्यातील कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्यावर कमीशनखोरी आणि अवैध धंद्यात गुतल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांची तक्रार कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान या आरोपांनंतर बाळू धानोरकर यांनी टेमुर्डे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे यांचे कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्यावर आरोप करणार पत्र कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पाठवले आहे. या पत्रात टेमुर्डे यांनी या पत्रात गंभीर आरोप केले आहेत. यावर कॉंग्रेसचे खासदार धानोरकर यांनी प्रत्तुत्तर देत टेमुर्डे राजकीय अस्तित्व संपलेली व्यक्ती असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

पुढे या गंभीर आरोपांवर बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले की, कुठली कमीशनखोरी, कुठले अवैध धंदे याचा उल्लेख त्यांनी करायला हवा. तसेच टेमुर्डे हे विधानसभेचे उपाध्यक्ष होते, आज त्यांची प्रकृती ढासळली आहे. मी त्यांच्या आरोपांना केराची टोपली दाखवतो.

माझं काम कसं आहे हे आमच्या पक्षातील गोष्ट आहे, त्यांना काय घेणं देण आहे असा सवाल देखील त्यांनी टेमुर्डे यांना केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, माझं काम पक्षश्रेष्ठींना माहिती आहे. मनसेनी पैसे दिले तर टेमुर्डे मनसेचा दुपट्टा घातलेले मी दाखवतो, निवडणुकीत जो उमेदवार पैसे देईल त्याच्या पाठीमागे मोरेश्वर टेमुर्डे उभे राहतात अशी त्यांची जिल्ह्यात ओळख आहे, असे धानोरकर म्हणाले आहेत. मोरेश्वर टेमोर्डे हे राजकीय अस्तित्व संपलेले व्यक्ती असल्याचे धानोरकर म्हणालेत. ते एक मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

आरोप काय आहेत?

मोरेश्वर टेमुर्डे यांनी राहुल गांधी यांना पाठवलेल्या पत्रात बाळू धानोरकर हे फक्त दारू दुकाने विकत घेणे, कमीशनखोरी अवैध धंद्यात गुतले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच धानोरकर हे उद्धट असून त्यांची लोकांशी नाळ तूटलेली आहे, त्यामुळे त्यांनालोकसभेची उमेदवारी त्यांना देऊ नये, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Qualifier 1: विराट कोहलीने GT विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ची चिंता वाढवली... समोर आले धक्कादायक अपडेट्स

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'गव्हर्नर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! मनोज वाजपेयींची मुख्य भूमिका

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

Eid Al-Adha 2026: भारतात बकरी ईद 27 मे की 28 मे रोजी साजरी होणार? जाणून घ्या नेमकी तारीख आणि भारतात कुठे, कशी साजरी होते ईद

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

SCROLL FOR NEXT