Nana Patole AND Satyajeet Tambe  esakal
महाराष्ट्र बातम्या

Satyajeet Tambe : 'हा घ्या पुरावा' काँग्रेसकडून सत्यजीत तांबेंना जशास तसं उत्तर

सकाळ डिजिटल टीम

नाशिकः नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांनी काही वेळापूर्पी काँग्रेस पक्ष आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर नाना पटोले यांनी हे आरोप फेटाळून लावले. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी तर पत्रकार परिषदेत पुराव्यानिशी तांबेंना उत्तरं दिली.

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसचा एबी फॉर्म न जोडता अपक्ष फॉर्म भरल्यामुळे सत्यजित तांबे यांच्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर काँग्रेससोबतची साथ सोडून ते भाजपासोबत जातात की काय, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. काँग्रेसचे नाव न वापरताही सत्यजीत तांबे मोठ्या मताधिक्याने अपक्ष म्हणूनच विजयी झाले. त्यांनी आज त्यांची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.

एबी फॉर्म चुकीचे दिले- तांबे

सत्यजीत तांबे लढतील की सुधीर तांबे हे ठरलेलं नव्हतं. त्यानंतर मला 9 जानेवारीला एबी फॉर्म द्यावा असं प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं. तर 11 तारखेला फॉर्म मिळाले. एबी फॉर्म चुकीचे देण्यात आल्याचा गौप्यस्फोट सत्यजीत तांबे यांनी केला आहे. हे फॉर्म चुकीचे आल्याचेही त्यांनी पक्षाला कळवले होते. ते म्हणाले जर मला अपक्ष फॉर्म भरायचा असता तर मी प्रदेश कार्यालयाला चुकीचा फॉर्म आल्याचं कळवलं नसतं असं सत्यजित तांबे म्हणाले.

दिलेले एबी फॉर्म योग्यच- काँग्रेस

सत्यजीत तांबे यांच्या दाव्यांना उत्तर देण्यासाठी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी यावेळी तांबे यांना दिलेले कोरे एबी फॉर्म त्यांनी दाखवले. लोंढे म्हणाले की, सत्यजीत तांबे यांना एबी फॉर्मचे फोटोही पाठवण्यात आले होते. त्यावर ते ओके म्हणालेले. परंतु वडिलांच्या जागेवर मी का लढवू, असं तांबे म्हणाल्याचं लोढेंनी सांगितलं. शिवाय त्यांनी कोणत्याही मुद्द्याचं व्यवस्थित उत्तर दिलं नसल्याचा आरोप लोंढेंनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतावर शंभर टक्के टॅरिफ लावण्याच्या प्रस्तावाला अमेरिकन सीनेटर्सचा तीव्र विरोध; म्हणाले, ''पायावर धोंडा मारुन घेण्यासारखे...''

Uttar Pradesh: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्लॅन B! अखिलेश यादव यांच्याशी चर्चेनंतर आघाडी होणार का?

Creta Car Accident : क्रेटा कार विहिरीत कोसळली; दोघांना बाहेर काढण्यात यश तर काहींचा शोध सुरु, पद्मावती गावाजवळील घटना

Milk Rate Increase : दूध दरात दोन रुपयांची वाढ; दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार

Pune News : झाडणकामावरून कर्मचाऱ्यांची झाडाझडती; कामात सहकार्य करण्याची तंबी

SCROLL FOR NEXT