Congress Nana patole critisize CM eknath shinde on vedanta foxconn jv project PM Modi amit shah  Sakal
महाराष्ट्र बातम्या

CM शिंदेंना मोदी-शाहांचा हस्तक व्हायचंय, ते याचसाठी का? पटोलेंचा खोचक सवाल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून राज्यातीस शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी गुजरातला गेलेला वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात परत आणण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे केली, यादरम्यान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'याचसाठी केला होता अट्टाहास!' अशा शब्दात शिंदे फडणवीस सरकारवर बोचरी टीका केली आहे.

महाराष्ट्रात येणारा वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर निर्मिती उद्योग प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यादरम्यान कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी ट्विट केलं आहे, यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "प्रस्थापित मविआ सरकार पाडून, सुरत-गुवाहाटी फिरून, हिंदुत्वाचा बनावटी चेहरा घेऊन ईडी सरकार सत्तेत आले. आणि आमच्या सरकारच्या काळात मंजूर झालेला फॉक्सकॉन-वेदांता हा इतका मोठा महाराष्ट्रातील प्रकल्प आता गुजरातला हलवण्यात आला आहे."

पुढे त्यांनी महाराष्ट्रीत एक लाख नोकऱ्या गुजरातला गेल्याचा उल्लेख केला आहे, ते म्हणाले की, "यामुळे महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या सुमारे 1 लाख नोकऱ्या गुजरातच्या घशात गेल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की त्यांना मोदी- शहा यांचा हस्तक होणे मंजूर आहे, ते याचसाठी का??" असा सवाल देखील त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

शिंदे गट हा पंतप्रधान मोदी, अमित शाह यांचे हस्तक असल्याची टीका शिवसेनेकडून केली जाते. या टीकेला उत्तर देताना पण याकुब मेमन आणि दाऊदचे हस्तक होण्यापेक्षा ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेले, कलम ३७० रद्द केले त्या नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे हस्तक होणे, हे केव्हाही बरे आहे. गद्दार आणि देशद्रोही लोकांचा हस्तक होण्यापेक्षा आम्ही मोदी-शाहांचे हस्तक होणार असू, तर ते आम्हाला चालेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद येथे बोलताना केले होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या या विधानाचा समाचार नाना पटोले यांनी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah Rukh Khan FDA Notice : तुकाराम मुंढे शाहरुख खानवर कारवाई करणार? FDA च्या नोटीसीला उत्तर न दिल्याने पुढील प्रक्रिया सुरू

6:30 वाजता WFH करण्यास सांगितलं, 9:30 वाजता Google Meetची लिंक आली अन् अवघ्या 5 मिनिटांत 80 जणांची नोकरी गेली; नक्की काय घडलं?

अकरावीत आईला म्हणाल्या मला रुचीरशीच लग्न करायचंय! मृणाल कुलकर्णी यांनी प्रेमासाठी केलेली बंडखोरी, अशी खुललेली लव्हस्टोरी

Ladki Bahin Yojana Latest Update : 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार! लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT