राजीव सातव  
महाराष्ट्र बातम्या

काँग्रेस पक्ष सदैव सातव कुटुंबियाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा - राहुल गांधी

राज्यसभेचे खासदार तथा गुजरात प्रभारी अॅड. राजीव सातव यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने बुधवार ( ता. 19 ) ला श्री सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑनलाइन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

संजय कापसे

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : राज्यसभेचे खासदार अॅड. राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबाप्रमाणेच काँग्रेस पक्षाचीही मोठी हानी झाली आहे. भविष्यात काँग्रेस पक्ष सदैव सातव कुटुंबियाच्या पाठीशी कायम भक्कमपणे उभा राहील अशी निसंदिग्ध ग्वाही काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवार (ता. 19) ला स्व. राजीव सातव यांना ऑनलाइन श्रद्धांजली वाहताना शोकसभेत व्यक्त केली. यावेळी श्री गांधी यांनी सातव यांच्या आठवणींना उजाळा दिला.

राज्यसभेचे खासदार तथा गुजरात प्रभारी अॅड. राजीव सातव यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने बुधवार ( ता. 19 ) ला श्री सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑनलाइन सभेचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत असलेल्या सोशल मीडिया अकाउंट वरुन त्या सभेचे प्रक्षेपण करण्यात आले. स्व. सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, के सी वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी के. एच. पाटील, गुलाम नबी आजाद, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत, नसीम खान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, खासदार, मंत्री, आमदार, सहभागी झाले होते.

हेही वाचा - खर्च परवडत नसल्याने आणि रुग्णसंख्याही कमी झाल्याने सिंहगड वगळता सर्वच कोव्हिड केअर सेंटर्स व क्‍वारंटाईन सेंटर्स बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, राजीव सातव हे शांत, संयमी व संवेदनशील मनाचे सच्चे काँग्रेस कार्यकर्ते होते. त्यांच्या जाण्यामुळे माझ्या कुटुंबाला व पक्षाला मोठा धक्का बसला. अतिशय कमी वयात त्यांनी पक्ष निष्ठा ठेवून माणसे जोडण्याचे काम केले होते. पक्ष त्यांच्या कार्याला कधीही विसरु शकत नाही असे नमूद केले. यावेळी त्या चांगल्याच भआवनिक झाल्या होत्या. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राजीव सातव युवकांचे प्रेरणास्थान होते. त्यांनी समाजातील वंचित युवकांची ऊर्जा ओळखून पक्षसंघटन वाढवण्यासाठी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. त्यांच्या निधनामुळे हानी झाली आहे.

यावेळी पक्ष नेते राहुल गांधी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, राजीव सातव आपल्यामध्ये नाहीत हे मन मानायला तयार नाही. मागील पंधरा वर्षापसून आम्ही सतत सोबत आहो. या काळात राजीव सातव यांनी पक्षवाढीसाठी निस्वार्थ भावनेने केलेले काम आपण जवळून पाहिले आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांप्रमाणेच आपणासही मोठा मानसिक धक्का बसला आहे. पक्षाकडून दिलेली जबाबदारी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडून पक्षासाठी वाहून घेतलेल्या राजीव सातव यांच्या जाण्यामुळे मी माझा वैयक्तिक जवळचा मित्र गमावला आहे. पक्षाचीही त्यांच्या निधनामुळे मोठी हानी झाली आहे. पक्ष त्यांचे कार्य कधीही विसरणार नाही. काँग्रेस पक्ष सदैव सातव कुटुंबीयांच्या मागे भक्कमपणे उभा राहील अशी निःसंदिग्ध ग्वाही राहुल गांधी यांनी यावेळी देत राजीव सातव यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांनी श्री सातव यांना श्रद्धांजली वाहताना आपल्या आठवणी सांगितल्या.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT