Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra esakal
महाराष्ट्र

Bharat Jodo Yatra: 'त्या' पैशांतून होतोय भारत जोडो यात्रेचा खर्च; भाजपचे गंभीर आरोप

संतोष कानडे

नागपूरः राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काल महाराष्ट्रात दाखल झाली. १२ ते १३ दिवस ही यात्रा महाराष्ट्रात असणार आहे. मात्र भाजपकडून या यात्रेच्या खर्चावरुन गंभीर आरोप करण्यात आलेत.

Chandrashekhar Bawankule on Bharat Jodo Yatra

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा खर्च हा अडीच वर्षांमध्ये कमावलेल्या भ्रष्टाचारातून होत आहे. हा पैसा कुठल्या अकाऊंटमधून खर्च होतोय याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बावनकुळे म्हणाले की, भारत जोडो यात्रा म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट आहे. नेत्यांच्या मुलांना लाँच करण्यासाठी ही यात्रा काढण्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय काँग्रेसमधील अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Congress Rahul Gandhi in Maharashtra

हेही वाचा : कर्ज परतफेडीच्या नियोजनाचे पाच मार्ग...

काँग्रेसची भारत जोडो यात्रा काल महाराष्ट्रात दाखल झाली. काँग्रेसच्या यात्रेचं महाराष्ट्रात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तेलंगाणामधल्या मिर्झापूर येथून मशाल हाती घेवून या पदयात्रेला सुरुवात झाली. या यात्रेत मशाल हाती घेऊन हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. फटाक्यांच्या आतिषबाजीत महाराष्ट्राच्या सीमेवर राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले.

राहुल गांधी हे स्वतः हातात मशाल घेवून चालत होते. प्रचंड उत्साह आणि भारत जोडोच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मशाल यात्रेत तरुणांची संख्या लक्षणीय होती. 8 वाजून 50 मिनिटाला सुरू झालेली मशाल पदयात्रा पुढे येऊन देगलूरमध्ये पोहचली.

नंतर राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून सभेला संबोधीत केले. त्यावेळी त्यांनी मोदींवर टीका केली. राहुल गांधी यांनी उपस्थित लोकांना त्याचे प्रश्न मला सांगा त्यासाठीच मी आलोय असं आवाहन केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT