rahul gandhi sakal
महाराष्ट्र बातम्या

राहुल गांधींच्या मुंबईतील सभेला परवानगी मिळणार का? गृहमंत्र्यांचं सूचक विधान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : येत्या २८ डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. याच दिवशी राहुल गांधी शिवाजी पार्क (Rahul Gandhi Mumbai Meeting) येथे सभा घेणार आहेत. याबाबत काँग्रेसकडून घोषणा करण्यात आली आहे. सरकारने एमआयएमच्या सभेला (AIMIM Mumbai Meeting) देखील परवानगी नाकारली होती. त्यात आता ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या सभेला परवानगी मिळणार का? असा प्रश्न आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Maharashtra Home Minister Dilip Walse Patil) यांनी सूचक विधान केले आहे.

येत्या काही दिवसांत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे काँग्रेसने आपली कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठीच राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यापूर्वी काँग्रेसने शिवतीर्थावर अनेक सभा घेतल्या. मात्र, राहुल गांधींच्या सभेला परवानगी मिळाली तर ही शिवतीर्थावरील त्यांची पहिलीच सभा असणार आहे. यापूर्वी २००३ आणि २००६ साली सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने शिवतीर्थावर सभा घेतली होती.

राहुल गांधींच्या सभेवरून ओवैसींचा निशाणा -

एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवैसी यांची शनिवारी मुंबईत सभा आयोजित करण्यात आली होती. तसेच एमआयएमकडून तिरंगा रॅली काढण्यात आली. पण, त्याला राज्य सरकारने ओमिक्रॉनचे संकट आहे, असं सांगून विरोध केला होता. परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही रॅलीचे आयोजन आणि सभा घेतल्याने काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी ओवैसींनी राहुल गांधींच्या सभेला परवानगी मिळणार का? असा सवाल केला होता. त्यांच्या सभेला परवानगी मिळेल आणि त्याठिकाणी सत्तेच्या चर्चा होतील, अशी टीकाही ओवैसींनी केली होती.

राहुल गांधीच्या सभेला परवानगी मिळणार का? -

राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेला परवानगी मिळणार का? याबाबत सूचक विधान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. एमआयएमच्या मुंबईतील सभेला परवानगी दिली नव्हती. जे नियम एमआयएमसाठी होते तेच नियम राहुल गांधी यांच्या सभेसाठी असतील, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले. त्यामुळे राहुल गांधीच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT