rajni patil sakal
महाराष्ट्र बातम्या

मराठीचा मुद्दा राज्यसभेत गाजला

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत पाटील यांनी मराठीतून केलेल्या भाषणाला नायडू यांनीही दाद दिली.

सकाळ वृत्तसेवा

‘अध्यक्षजी, तुम्ही भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करता. तुम्ही तुमचे वजन वापरून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मोदी सरकारला सूचना द्या,’ अशा शब्दांत काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी थेट राज्यसभाध्यक्षांनाच साकडे घातले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत पाटील यांनी मराठीतून केलेल्या भाषणाला नायडू यांनीही दाद दिली.

फादर स्टीफन्स यांच्या ‘...तैसी भाषांमाजी साजिरी मराठिया‘ या काव्यपंक्तींचा दाखला देऊन पाटील म्हणाल्या, की साडेबारा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात अनेक जातीधर्माच्या लोकांची बोलीभाषा मराठी आहे. मराठी ज्ञानी लोकांची, विद्वानांची , कष्टकऱ्यांची, धर्माची भाषा आहे. सारे निकष पूर्ण करूनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्राकडून अजूनही मिळत नाही. भारत सरकारने १५ वर्षांपूर्वी सर्वप्रथम तमिळला व नंतर संस्कृत, तेलुगु, कन्नड़, मल्याळम व ओडिशा या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला. मराठीमध्ये थोडथोडक्या नव्हे तर ५२ बोलीभाषा आहेत. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. यावर्षी त्या दिनाच्या निमित्ताने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने याबाबत सांस्कृतिक मंत्र्यांना प्रस्ताव पाठविला आहे. राज्याच्या रंगनाथ पठारे समितीने तयार केलेला अहवाल केंद्र सरकारला मान्य असून याबाबत सरकारचे धोरण सकारात्मक आहे, असे केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी लोकसभेतही स्पष्ट केले आहे.

नायडू यांच्याकडून दाद !

रजनी पाटील या नायडूंना म्हणाल्या, की तुम्ही ज्ञानी आहात. भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्नही करत असता. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी तुम्ही आपले ‘वजन ‘वापरून केंद्राला तशी सूचना करावी. त्यांच्या या टिप्पणीवर सभागृहात हास्याची लकेर उमटली. पाटील यांच्या भाषणानंतर नायडू यांनी मराठीतूनच दाद देताना म्हटले की ‘तुमचे अभिनंदन. तुम्ही चांगले बोलला आहात’ यावरही सभागृहाने बाकांच्या गजरात पाटील यांना दाद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT