pm narendra modi, cm eknath shinde dcm devendra fadanvis sakal
महाराष्ट्र बातम्या

PM Modi Mumbai Visit : PM मोदींच्या लोकप्रियतेवर शिंदे-फडणवीस सरकारचा विश्वास नाही; काँग्रेसचा हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली. पंतप्रधान गुरुवारी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील मैदानावर एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.दरम्यान पंतप्रधान मोदींच्या सभेला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

दरम्यान मोदींच्या या सभेला मुंबईतील शाळा शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. (Congress On PM Modi Mumbai Visit)

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी याबद्दल ट्विट करत मोदींच्या लोकप्रियतेतून गर्दी जमेल असा विश्वास राज्य सरकारला नसल्याचे स्पष्ट झाल्याचे म्हटले आहे.

त्यांनी ट्विट केलं आहे की, "पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी मुंबईतील प्रत्येक शाळांनी एका शिक्षकाला पाठवणे अनिवार्य आहे असा संदेश शासनाने दिलेला दिसतो. पंतप्रधानांच्या तथाकथित लोकप्रियतेतून गर्दी जमेल यावर तथाकथित लोकप्रिय शिंदे फडणवीस सरकारचा विश्वास नाही हे यातून स्पष्ट होते."

सचिन सावंत यांनी शाळांना पाठवण्यात आलेल्या कथित मेसेजचा स्क्रिनशॉट देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये मुंबईतील सर्व शाळेतील प्रत्येक एका शिक्षकाला पंतप्रधान मोदी यांच्या सभेला उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी हे मुंबईत सुमारे 38,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. तसेच ते मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन करतील आणि मेट्रोचा आनंदही घेतील. ते सुमारे 12,600 कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो रेल्वे लाईन्स 2A आणि 7 देशाला समर्पित करतील. 2015 मध्ये पंतप्रधानांनी या मार्गांची पायाभरणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT