महाराष्ट्र बातम्या

मोदींविरुद्ध भाजपा नेते आंदोलन करणार का?

नामदेव कुंभार

रुग्ण वाढले तर मोदी टिका करतात दुसरीकडे भाजप नेते रुग्ण वाढतील हा प्रयत्न करतात.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमिमुळे मागील दीड वर्षांपासून राज्यातील मंदिरं बंद आहेत. महाराष्ट्र भाजपने मंदिरं उघडण्यासाठी आज, सोमवारी राज्यभर शंखनाद आणि घंटानाद आंदोलन पुकारलं आहे. पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह राज्यभरात ठिकठिकाणी भाजपच्या वतीने आंदोलने सुरु आहेत. मंदिरं पुढील आठ दिवसांत उघडावीत, या मागणीसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनात कोरोना नियम पायदळी तुडल्याचं दिसत आहे. काँग्रेसनं या मुद्द्यावरून भाजपच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'एकीकडे राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे मोदी सरकार टीका करत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे नेते कोरोनाला आमंत्रण देत आहेत, अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली.'

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'भाजपा सरकारांनी कावड यात्रेवर बंदी का घातली? केंद्र सरकारने उत्सवावर निर्बंध घालावेत हे निर्देश दिले आहेत. मोदींविरुद्ध भाजपा नेते आंदोलन करणार का? दुसरी लाट वाढवण्याचे काम भाजपाने केले आता तिसरी लाट लवकर यावी यासाठी यांचा प्रयत्न आहे.'

शंखासूर भाजपा आंदोलनातून सरळ सरळ कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करत आहे. चंद्रकांत पाटील स्वतः मास्क घालत नाहीत. मोदी सरकारच्या निर्देशांनाही किंमत देत नाहीत. अध्यात्मिक आघाडी या थोतांडातून अध्यात्म या पवित्र मार्गाचे विकृतीकरण हिंदू धर्माचा अवमान आहे. भाविकांच्या जीवाचीही पर्वा नाही, असा हल्लाबोल सचिन सावंत यांनी केला. रुग्ण वाढले तर मोदी टिका करतात दुसरीकडे भाजप नेते रुग्ण वाढतील हा प्रयत्न करतात. जनतेच्या जीवाशी खेळ मांडला आहे. पोलीसांनी कठोर कारवाई करावी बघ्याची भूमिका घेऊ नये, असेही सावंत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT