Ajit Pawar and Nana Patole Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: "बहुमताचा आकडा असेल तर...", अजित पवारांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या इच्छेवर नाना पटोलेंनी फेरलं पाणी

अजित पवारांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली

अंकिता खाणे (Ankita Khane)

'सकाळ' माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले की, मला शंभर टक्के मुख्यमंत्री व्हायला आवडेल. त्यासाठी 2024ची वाट का पाहायची? असा सवाल करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली महत्त्वकांक्षा जाहीर केली. राष्ट्रवादीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच त्यांनी हे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे अजितदादा काहीही करू शकतात. कोणत्याही क्षणी कोणताही निर्णय घेऊ शकतात अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत.

अजित पवारांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त करण्यात गैर काय आहे? पण महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनायला 145 आकडा लागतो. हा आकडा अजित पवार यांच्याकडे असेल तर त्यांनी अगदी सहज मुख्यमंत्री बनावं. मी बनतो, मी बनतो असं म्हणण्याचं काहीच कारण नाही असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

ते विधान टाळता आलं असतं- नाना पटोले

तर अजित पवार यांनी मुलाखतीवेळी एका प्रश्नाचं उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात नाईलाजाने काम केलं असं म्हणाले यावर बोलताना पटोले म्हणाले की, नाईलाज हा शब्द वापरण्यापेक्षा तुम्ही शपथ नव्हती घ्यायची. तुम्ही पदावर बसून खदखद व्यक्त केली त्यापेक्षा पदावर न बसता खदखद व्यक्त करायला हवी होती. या व्यक्तव्याची अपेक्षा आम्हाला नव्हती. प्रत्येक मुख्यमंत्री या राज्याला काही ना काही देऊन गेला. त्यामुळे असं वक्तव्य करणं चुकीच आहे. तुम्हाला तेव्हा काही गोष्टी आवडल्या नाहीत तर त्याचवेळी त्यांनी बोलायला हवं होतं असंही पटोले यावेळी म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते अजित पवार?

पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता. त्यांच्या काळात मी उपमुख्यमंत्री पदावर काम केलं. २०१९ला महाविकास आघाडी झाली. ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आम्ही एकत्रिपणे चांगलं काम केलं. पृथ्वीराज बाबांच्या कार्यकाळात आम्ही चार वर्षे काम केलं. कधी कधी समाधानाने काम करावं लागतं, तर कधी नाईलाजाने. उद्धव ठाकरेंच्या काळात आम्ही आनंदाने काम केलं परंतु पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात आम्ही नाईलाजाने काम केलं, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT