Congress Ticket For Vidhan Sabha Esakal
महाराष्ट्र बातम्या

Congress Ticket For Vidhan Sabha: 1400 जणांना व्हायचेय काँग्रेसचे आमदार, महायुतीच्या नेत्यांनीही मागितली उमेदवारी

Congress Maharashtra Vidhan Sabha Election: गेल्या 10 वर्षांत पक्षाला राज्यात खूप कठीण काळातून जावे लागले. या काळात झालेल्या काही निवडणुकांमध्ये तर उमेदवारही मिळत नव्हते.

आशुतोष मसगौंडे

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसने दणदणीत यश मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. या निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला दोरदार धक्का देत आघाडी घेतली.

दरम्यान या निकालानंतर आता काँग्रेसमधील नेत्यांसह महायुतीच्या नेत्यांचाही पक्षावर विश्वास वाढला आहे. कारण दोन महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील 1400 जणांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. इतकेच नव्हे तर काँग्रेसकडे उमेदवारी मागणाऱ्या नेत्यांमध्ये महायुतीच्या काही नेत्यांचाही समावेश आहे. याबाबतचे वृत्त फ्री प्रेसने दिले आहे.

यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले की, विधानसभेसाठी तिकीट पाटप मेरिटच्या आधारावरच होईल.

ते म्हणाले, “लोकसभेच्या निकालानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. आम्हाला इच्छुक उमेदवारांकडून हजारो अर्ज प्राप्त होत आहेत, परंतु आम्ही हे स्पष्ट केले आहे की उमेदवारी मेरिटनुसार दिली केली जाईल. यासह इतर पक्षातील प्रमुख नेतेही आमच्यासोबत येण्यास उत्सुक आहेत."

दरम्यान, 2014 मध्ये आधी केंद्रातून काँग्रेसची सत्ता गेली आणि नंतर त्यांनी महाराष्ट्रही गमावले. अशात गेल्या 10 वर्षांत पक्षाला राज्यात खूप कठीण काळातून जावे लागले. या काळात झालेल्या काही निवडणुकांमध्ये तर उमेदवारही मिळत नव्हते.

मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बदलल्याचे पाहायला मिळाले. लोकसभेत काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष झाल्यानंतर विधानसभेतही सर्वात मोठा पक्ष होण्याचे अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे अनेकजण काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

2014 मध्ये 42 जागा जिंकलेली काँग्रेस 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 44 जागा जिंकली होती. त्यामुळे आता यंदाच्या विधानसभेत काँग्रेस कशी कामगिरी करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सर्व 288 जागांवर सर्वे केला आहे. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावातपाच्या बैठकीत सुमारे 135 जागा मागितल्याची चर्चा आहे. आता मविआच्या जागावाटपात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्व इच्छुकांचे डोळे लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT