Congress VS NCP 
महाराष्ट्र बातम्या

Congress VS NCP: पवारांच्या बालेकिल्ल्यावर काँग्रेसचा दावा! जाणून घ्या कोणाची किती आहे ताकद

Sandip Kapde

Congress VS NCP: माढा लोकसभा मतदारसंघ संघावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जुंपण्याची शक्यता आहे. गेली २००९ पासून माढा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मात्र आता काँग्रेसने देखील दावा सांगितला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  माढ्यातील कार्यकर्त्यांना कामाला लागा, असा आदेश दिला. माढ्याचा पुढचा खासदार काँग्रेसचा असेल, असा दावा देखील चव्हाणांनी केला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील माण, खटाव आणि फलटण या विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत यावेळी चव्हाणांनी बोलताना लोकसभेची तयारी करा, असे सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

माढा लोकसभा मतदारसंघाच एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. करमाळा, सांगोला, माळशिरस, फलटण, माण, माढा हे विधानसभा मतदार संघ आहेत. १९ फेब्रुवारी २००८ ला या मतदारसंघाची स्थापना झाली होती.

पहिल्या निवडणुकीपासून माढ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. २००९ पहिल्या निवडणुकीत  शरद पवार माढामधून निवडणून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचा विजय झाला होता. २०१९ मध्ये देखील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे होते. मात्र त्यांचा भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबळकर यांनी पराभव केला. (Latest Marathi News)

आता आगामी लोकसभेसत तीव वेळा निवडणूक लढवलेली जागा राष्ट्रवादी सोडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आता जुंपण्याची शक्यता आहे. शरद पवार किंवा अजित पवार आता काय भूमिका घेणार, हे महत्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT