Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

ठाकरेंचं मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी 'हा' पक्ष बाहेरून पाठिंबा देण्यासाठी तयार होता, पण...

रुपेश नामदास

Uddhav Thackeray: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि ४० आमदारांना सोबत घेत भाजपाशी युती केली. राज्यात शिंदे भाजप सरकार देखील स्थापन झालं. यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदावरून पाय उतार व्हायला लागलं होतं.

वारंवार एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी बंडचं कारण राष्ट्रवादी-काँग्रेस असल्याचं सांगत होते. मात्र काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

अशोक चव्हाण एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मविआ सरकार कोसळत होतं त्यावेळीचा एक किस्सा सांगितला ते म्हणाले, ज्यावेळ सरकार कोसळत होतं, त्यावेळी काही लोकांनी उल्लेख केला की काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे आम्ही शिवसेना सोडून चाललो आहे, त्यानंतर उद्धवजी राजीनामा देण्यासाठी जात होते त्यावेळी मी त्यांना सांगितलं आमची भूमिका स्पष्ट आहे.

जर आमच्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर काँग्रेस पक्ष तुम्हाला बाहेरून पाठिंबा देईल पण तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कायम राहिलं पाहिजे, तुम्ही तुमचा कार्यकाळ पाच वर्ष पुर्ण केला पाहिजे, अशी माहिती त्यांनी दिली.

तर पुढं म्हणाले की, मी अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं मी देखील मुख्यमंत्री राहिलो पण असा उद्धवजीं सारखा मुख्यमंत्री होणे नाही असं मी जाहीर पणे सांगतो असं म्हणत चव्हाणांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केलं.

दरम्यान महाविकास आघाडी सरकार कोसळलं असलं तरी दखील मविआ आघाडी मजबुत ठेवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र सभा घेत आहेत. वज्रमूठ सभेतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात सभा घेत आहेत. आणि पुढील काळात देखील मोठ्या जाहीर सभेंचे नियोजन चालू आहे. दरम्यान १मे रोजी मविआ मुंबईत वज्रमूठ सभा घेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT